'सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यू' यादीतही विराट कोहली 'किंग', शाहरुख अन् 'या' तिघांना टाकलं मागे

Most Valuable Brand Celebrity in india : सेलिब्रिटी ॲसेट ॲडव्हायझरी कंपनी क्रॉलने एका अहवाल जारी केला आहे. त्यानुसार 2023 मध्ये भारतातील टॉप 5 सिलिब्रेटी कोण ठरलेत? याची नावं समोर आली आहेत. क्रिकेटचा किंग म्हटलं की अनेकांना एकच नाव आठवतं, ते म्हणजे विराट कोहली... मात्र, सिलिब्रेटीच्या यादीत देखील विराट कोहली किंग ठरलाय. 2023 मध्ये विराटची संपत्ती 22.79 मिलियन डॉलर (सुमारे 1,891 कोटी) आहे.

| Jul 18, 2024, 19:03 PM IST
1/5

विराट कोहली

क्रिकेटचा किंग म्हटलं की अनेकांना एकच नाव आठवतं, ते म्हणजे विराट कोहली... मात्र, सिलिब्रेटीच्या यादीत देखील विराट कोहली किंग ठरलाय. 2023 मध्ये विराटची संपत्ती 22.79 मिलियन डॉलर (सुमारे 1,891 कोटी) आहे.

2/5

रणवीर सिंग

वर्षभरापूर्वीच्या तुलनेत कोहलीच्या कमाईत 29 टक्क्यांनी वाढ झाल्याने रणवीर सिंगला मागे टाकलंय. रणवीर सिंग आता दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. रणवीरची संपत्ती मागील वर्षी 203.1 मिलियन डॉलर राहिली.

3/5

शाहरुख खान

तिसऱ्या क्रमांकावर राहिलाय बॉलिवूडचा किंग... होय, शाहरुख खान.. जवान आणि पठाण या सिनेमांच्या यशानंतर शाहरुखची ब्रँड व्हॅल्यू 120.7 मिलियन डॉलर आहे.

4/5

अक्षय कुमार

अक्षय कुमार 2022 मध्ये तिसऱ्या स्थानावरून 2023 मध्ये चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. मागील वर्षी त्याची ब्रँड व्हॅल्यूअशन 111.7 मिलियन डॉलर होती.

5/5

आलिया भट्ट

दरम्यान, आलिया भट्ट ही देखील टॉप 5 मध्ये सामील आहे. आलिया चौथ्या क्रमांकावरून घसरून 5 व्या क्रमांकावर गेली असली तरी तिची ब्रँड व्हॅल्यू 101.1 मिलियन डॉलर इतकी आहे.