Shubman Gill: 'मी शुबमनच्या जागी असतो तर...', Virender Sehwag लाख मोलाचं बोलला, म्हणतो...

Virender Sehwag On Shubman Gill: शुभमनने (Shubman Gill) 94 धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या या खेळीवर वीरेंद्र सेहवागच्या (Virender Sehwag) वक्तव्याचा परिणाम होता, अशी चर्चा आता सुरू झालीये. नेमकं सेहवाग काय म्हणाला होता? 

| May 07, 2023, 20:05 PM IST

Virender Sehwag Statement On Shubman Gill: गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायन्ट्स (GT vs LSG) यांच्यात झालेल्या सामन्यात सलामीवीर शुभमन गिलने आक्रमक फलंदाजी करत लखनऊच्या बॉलर्सला भर उन्हात चांदण्या दाखवल्या. या सामन्यात शुभमनने (Shubman Gill) 94 धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या या खेळीवर वीरेंद्र सेहवागच्या (Virender Sehwag) वक्तव्याचा परिणाम होता, अशी चर्चा आता सुरू झालीये. नेमकं सेहवाग काय म्हणाला होता? 

1/5

मी शुबमन गिल असतो तर स्वत:वर खूश नसतो. सध्याचा फॉर्म पाहता मी आणखी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला असता, असं वीरेंद्र सेहवागने म्हटलंय.

2/5

शुभमन 10 सामने खेळलाय, त्यात त्याने 375 धावा केल्यात. परंतु, यामध्ये खूप काही सुधारणा दिसत नाही, असं म्हणत त्याने खेद व्यक्त केलाय. 

3/5

शुभमन नेहमी सकारात्मक दृष्टीकोनतून मैदानात उतरतो. मात्र, धावांचे आकडे खूप मोठं समाधान देऊन गेले नाहीत, असं म्हणत सेहवागने नाराजी व्यक्त केलीये.

4/5

शेवटच्या चार सामन्यात तो कमालीची फलंदाजी करेल, अशी आशा देखील सेहवागने व्यक्त केलीये. त्याचबरोबर शुभमनने शतक करावं, अशी इच्छा देखील सेहवागने व्यक्त केलीये.

5/5

दरम्यान, 20 ओव्हरमध्ये जबरदस्त आतिषबाजी करत गुजरातने 227 धावांचा डोंगर गुजरातने उभा केला होता. यात खास राहिला तो शुभमन गिल (Shubman Gill), त्याने 51 बॉलमध्ये 94 धावांची नाबाद खेळी केली. त्यात 7 सिक्सचा समावेश आहे.