थंडीत Snowfall ची घ्या मजा... Travel List करा तयार

Dec 15, 2018, 16:11 PM IST
1/5

शिमला, हिमाचल प्रदेश

शिमला, हिमाचल प्रदेश

शिमला भारतातील त्या ट्रॅवल डेस्टीनेशनमधील एक आहे जिथे भारतीयच नाही तर विदेशी लोकांच्या देखील गर्दी असते. डिसेंबर ते जानेवारीपर्यंतचा काळ अतिशय चांगला असतो. 

2/5

लदाख, जम्मू-कश्मीर

लदाख, जम्मू-कश्मीर

लदाखमध्ये बर्फाचा आनंद घेण्यासाठी ऑक्टोबर ते मार्चपर्यंत सर्वाधिक चांगला कालावधी मानला जातो. इथे जमलेल्या बर्फाचा तुम्ही  मनमुराद आनंद लुटू शकता. 

3/5

तवांग, अरुणाचल प्रदेश

तवांग, अरुणाचल प्रदेश

अरुणाचल प्रदेशच्या उत्तरी पश्चिमी भागात असलेला तवांग हा देश भूतानच्या सीमेवर वसलेला आहे. हे ठिकाण 3400 मीटर उंचीवर हिमालयांमध्ये वसलेलं आहे. या ठिकाणी फिरायला जायला ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी उत्तम आहे. कारण या दरम्यान सगळीकडे बर्फाची चादर पांघरलेली असते.   

4/5

मनाली, हिमाचल प्रदेश

मनाली, हिमाचल प्रदेश

मनाली हे हिलस्टेशनसाठी सर्वत्र ओळखलं जातं. नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत या ठिकाणी बर्फाचा मनमुराद आनंद घेऊ शकता. इथे खाण्या पिण्याची व्यवस्था अतिशय चांगली असते. 

5/5

गुलमर्ग, जम्मू कश्मीर

गुलमर्ग, जम्मू कश्मीर

कश्मीरला तर भारतातील स्विझरलँड म्हटलं जातं. दरवर्षी उन्हाळ्यात या ठिकाणी अनेक पर्यटक भेटी देतात. या ठिकाचं सौदर्य बघून पृथ्वीवरील स्वर्ग असं संबोधलं जातं. इथे गुलमर्ग, डलझील, नागिन झील, परी महल आणि पहलगाम ही पाहण्यासारखी ठिकाण आहे. पण जेव्हा बर्फाळ भागाची चर्चा होते तेव्हा गुलमर्गचं नाव सर्वात पहिलं घेतलं जातं.