Weekly Numerology : 'हे' मूलांक असलेल्या लोकांच्या आयुष्यात आनंद व समृद्धीचे मार्ग होणार खुले

Saptahik Ank jyotish 18 to 24 march 2024 :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मुलांक हा 2+4 = 6. 6 हा तुमचा मूलांक असणार आहे. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 18 मार्च ते 24 मार्च हा आठवडा कसा जाणून घेऊयात. 

Mar 17, 2024, 16:08 PM IST
1/10

Weekly Numerology 18 to 24 march 2024

मार्च महिन्याचा तिसरा आठवडा हा अंकशास्त्रानुसार 8 व्या क्रमांकाचा स्वामी शनिदेव कुंभ उदयास येईल. तर 9व्या क्रमांकाचा स्वामी मंगळ आणि 6व्या क्रमांकाचा स्वामी शुक्र कुंभ राशीत असल्याने इथे त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. अंक आणि ग्रहांची ही गणना मार्चच्या या आठवड्यात अनेक लोकांसाठी आर्थिक लाभाची ठरणार आहे. जन्मतारखेच्या आधारे जाणून घेऊया की 1 ते 9 अंक असलेल्या सर्व लोकांसाठी हा आठवडा कसा असणार आहे. 

2/10

मूलांक 1

हा आठवडा 1 क्रमांक मूलांक असलेल्या लोकांसाठी प्रगतीचा असणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी प्रकल्पाशी संबंधित आनंदीची बातमी मिळणमार आहे. तुमची आर्थिक स्थितीही सुधारणार आहे. प्रेम जीवनात आनंद असणार आहे. जोडीदारासोबत तुमच नातं मजबूत होणार आहे. कुटुंबात शांती आणि आनंद असणार आहे. वडिलांच्या मदतीने अनेक कामं मार्गी लागणार आहेत. 

3/10

मूलांक 2

मूलांक क्रमांक 2 असलेल्या लोकांसाठी हा आठवडा प्रगती आणि यश घेऊन आला आहे. तुम्ही भविष्यातील नियोजन करणार आहात. त्यासाठी काही ठोस निर्णयही तुम्ही घेणार आहात. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद असेल. जोडीदारासोबत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. आर्थिक बाबतीत फायदा होणार आहे. आयुष्यात आनंद आणि समृद्धीचे मार्ग तुमच्यासाठी खुले होणार आहेत. 

4/10

मूलांक 3

या लोकांसाठी हा आठवडा उत्तम असणार आहे. प्रकल्पात यश मिळणार आहे. अनेक नवीन संधी मिळणार आहेत. प्रेम जीवनात परस्पर प्रेम वाढणार असून विवाहित लोक या आठवड्यात महत्त्वाचा निर्णय घेणार आहेत. अनेक ठिकाणाहून पैसांचा ओघ वाढणार असल्याने आर्थिक स्थिती सुधारणार आहे. कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या तब्येतीचीही चिंता तुम्हाला सतावणार आहे. आठवड्याच्या शेवटी चांगली बातमी कानावर पडणार आहे. 

5/10

मूलांक 4

या लोकांना या आठवड्यात आर्थिक बाबतीत थोड धाडस दाखवाव लागणार आहे. तुमच्या या धाडसामुळे तुम्हाला फायदा होणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येणार आहे. कुटुंबात धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन होणार आहे. भावांसोबत सुरु असलेला वाद मिटणार आहे.     

6/10

मूलांक 5

या लोकांना कामाच्या ठिकाणी चांगला अनुभव येणार आहे. तुमच्या चातुर्याने जीवनात आनंद आणि समृद्धी नांदणार आहे. प्रेम जीवनात, परस्पर प्रेम मजबूत होणार आहे. सुंदर भविष्यासाठी काही ठोस निर्णय घेणार आहेत. तुमच्या भावनिक स्थितीमुळे या आठवड्यात आर्थिक खर्च दुप्पटीने वाढणार आहे. आठवड्याच्या शेवटी, तुम्ही अनेक गोष्टींमध्ये व्यस्त असणार आहे.

7/10

मूलांक 6

मूलांक क्रमांक 6 असलेले लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहेत. प्रकल्पसाठी इतरांची मदत लाभणार आहे. प्रेम जीवनात जोडीदारासोबत नातं मजबूत होणार आहे. भावनिक कारणांमुळे तुमचा खर्च वाढणार आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका, ती अधिक त्रासदायक ठरेल. कोणत्याही गुप्त गोष्टी मित्रांना सांगणे टाळा अन्यथा तुमची बदनामी होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी मनं थोड अस्वस्थ असणार आहे.   

8/10

मूलांक 7

मार्च महिन्याचा हा आठवडा 7 क्रमांकाच्या लोकांसाठी महत्त्वाचा असणार आहे. तुमचं मन कुठल्या तरी कारणाने अस्वस्थ असणार आहे. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे शब्द तुमच्या हृदयाला घायाळ करणार आहे. आर्थिक बाबीत खर्च वाढणार आहे. तर आठवड्याच्या शेवटी आळस अंगावर येणार आहे. यश मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागणार आहे. तरी यश मिळवण्यासाठी वेळ लागणार आहे. 

9/10

मूलांक 8

हा आठवडा या लोकांसाठी चढ उताराचा असणार आहे. तुम्हाला या आठवड्यात प्रकल्पात यश मिळणार आहे. कुटुंबातील वडीलधाऱअया व्यक्तीची प्रकृती खराब होणार आहे. त्यामुळे तुम्ही चिंतेत असणार आहात. तुमच्या खाण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. आर्थिक घडी बिघडणार आहे. या काळात बोलण्यावर नियंत्रण ठेवा. अन्यथा प्रियजनांना विनाकारण दुखवाल. मात्र आठवड्याच्या शेवटी आनंदाची बातमी तुम्हाला प्रसन्न करेल. 

10/10

मूलांक 9

मार्चचा हा आठवडा 9 क्रमांकाच्या लोकांसाठी सामान्य असणार आहे. कामाच्या ठिकाणी अडचणी येणार आहे. त्या अडचणी संवादातून सोडवा अन्यथा कामं बिघडतील. आर्थिक खर्च दुपट्टीने वाढणार आहे. नवीन गुंतवणूक टाळा कारण हा काळ कठीण असणार आहे. रागावर नियंत्रण ठेवा. नाही तर होणारी कामंही बिघडतील. आठवड्याच्या शेवटी यश तुमच्या आयुष्यात येणार आहे. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)