22 सप्टेंबरला चांद्रयान 3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा अ‍ॅक्टीव्ह झाले नाहीत तर?

विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडवर आहेत. 22 सप्टेंबरला या मोहिमेचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे.

Sep 04, 2023, 23:58 PM IST

chandrayaan 3 pragyan rover and vikram lander :  भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेतील पहिला टप्पा यशस्वपीरीत्या पार पडला आहे. 14 दिवस संशोधन करुन विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडवर गेले आहेत. 22 सप्टेंबरला यांना पुन्हा नॉर्मल मोडवर आणले जाणार आहे. मात्र, 22 सप्टेंबरला चांद्रयान 3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा अ‍ॅक्टीव्ह झाले नाहीत तर?

1/8

22 सप्टेंबरला चंद्रावर पुन्हा सूर्योदय होवून दिवस उजाडणार आहे. मात्र, 22 सप्टेंबरला चांद्रयान 3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा अ‍ॅक्टीव्ह झाले नाहीत तर? या मोहिमेचे काय होईल.    

2/8

22 सप्टेंबरला विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा अ‍ॅक्टीव्ह झाले नाहीत तर चांद्रयान 3 मोहिम संपुष्टात येईल. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर तसेच चंद्राच्या पृष्ठभागावर पडून राहतील.    

3/8

विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर बॅटरी चार्ज केल्यानंतर ते पुन्हा कार्यन्वित केले झाले जाणार आहेत. 

4/8

22 सप्टेंबरला चंद्रावर पुन्हा सूर्योदय झाल्यानंतर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरवर असलेल्या सोल पॅनलच्या मदतीने यांच्या बॅटरी जार्च केल्या जाणार आहेत.

5/8

रिसीव्हरच्या मदतीने इस्रोची टीम विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्या संपर्कात राहणार आहे. मात्र, हे कोणतही संशोधन करणार नाहीत. 

6/8

विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडमध्ये गेले आहेत. यांचे सर्व सिस्टीम बंद करण्यात आले आहेत. फक्त  रिसीव्हर ऑन ठेवण्यात आले आहेत. 

7/8

विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरवर असलेले पेलोड हे सोलर बॅटरीवर चार्ज होतात. यांची चार्जिंग संपण्याआधी त्यांना स्लीप मोडवर टाकण्यात आले आहे. 

8/8

चंद्रावर एक दिवस हा पृथ्वीच्या 14 दिवसांइतका असतो. 23 ऑगस्ट 2023 रोजी  चांद्रयान 3 चंद्रावर लँड झाले तेव्हा तेथे सूर्योदय होत होता. आता चंद्रावर रात्र सुरु झाल्यामुळे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडवर गेले आहेत.