नवरा बायकोमध्ये 'या' पाच कारणामुळे होतात घटस्फोट, अशी चूक करूच नका

Causes of divorce : नात्यात परिपक्वता असेल तर कोणतंही नातं खराब होणार नाही, असं म्हणतात. मात्र, कोणत्या चुका नातं खराब करतात? जाणून घ्या  

| Apr 15, 2024, 19:09 PM IST

Common Reason of divorce in India : भारतीय संस्कृतीत लग्नाचं नातं हे पवित्र बंधन मानलं गेलं आहे. गेल्या काही दिवसात घटस्फोटाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्याची कारण काय? पाहा

1/7

घटस्फोट

नवरा बायकोच्या नात्यात कटूता आणि दुरावा निर्माण झाल्याने घटस्फोट होत असल्याचं प्रकर्षाने दिसून येतं. मात्र, काही गोष्टी टाळता आल्यात नातं देखील घट्ट राहतं.

2/7

संवादाचा अभाव

नवरा बायकोमध्ये योग्य संवादाचा अभाव हे जगभरात घटस्फोटाचे प्रमुख कारण आहे. कोणत्याही नात्यात एकमेकांच्या भावना समजून घेणं महत्त्वाचं असतं.

3/7

एकमेकांचा आदर करा

वैवाहिक आयुष्यात पती-पत्नीमध्ये आदर असणं अत्यंत आवश्यक आहे. नात्यात तिरस्कार किंवा अपमानाच्या गोष्टी आल्या तर एकमेकांमधील प्रेम कमी होतं.

4/7

आर्थिक संतुलन

सध्याच्या काळात आर्थिक असुरक्षितता नवरा आणि बायकोमधील घटस्फोटाचं कारण ठरत आहे. पैश्यांवरून होणारी भांडणं दोन्ही व्यक्तींमधील तणाव वाढवतो.

5/7

विश्वास हवाच

कोणत्याही नात्यात विश्वास हा महत्त्वाचा असतो. जोडीदाराविषयी विश्वास असणं आवश्यक आहे. नवरा बायकोमध्ये विश्वास निश्चित असायला हवा. त्यामुळे नातं टिकून राहतं.

6/7

कौटुंबिक हस्तक्षेप टाळा

नवरा आणि बायको यांच्यातील भांडणं दोघांनीच सोडवायला हवी. समज- गैरसमज टाळायचे असतील तर दोघांनीच टाळावेत. कौटुंबिक हस्तक्षेप नात्यातील गुंता वाढवतो. 

7/7

वाईट बोलू नका

दरम्यान, एकमेकांच्या सवयी जाणून घेण्यासाठी वेळ द्या. रागाच्या भरात वाईट गोष्टी बोलू नका. त्याचा थेट परिणाम तुमच्या नात्यावर होतो. स्वभावात परिपक्वता तयार करा. तुमचं नातं बिघडणार नाही.