लडाखमध्ये भारत-चीन सीमेवर काय आहे आताची स्थिती, पाहा ताजी दृश्य

Feb 16, 2021, 16:43 PM IST
1/4

पूर्व लडाखमध्ये पँगाँग लेकजवळ उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यापासून चीन आणि भारताचं सैन्य आता माग हटलं आहे. संपूर्ण प्रक्रिया होण्यासाठी आणखी ६ ते ७ दिवस लागेल. पँगाँग लेकच्या उत्तर किनाऱ्यापासून चीनच्या सैन्याने बंकर, चौक्या आणि इतर गोष्टी हटवल्या आहेत. चीनी सैन्याची संख्या कमी झाली आहे. भारताने याबाबतचे फोटो शेअर केले आहेत.

2/4

दोन्ही बाजुच्या कंमाडर स्तरावर चर्चा झाल्यानंतर सैन्य मागे घेण्यात येत आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांचे रणगाडे 100 मीटरपर्यंत जवळ आले होते. मात्र आता चीन मागे हटल्यानंतर भारतानं आपले रणगाडे मागे घेण्यास सुरूवात केली आहे.

3/4

गेल्या अनेक महिन्यांपासून लडाखच्या पँगाँग लेकवर असलेली तणावाची स्थिती आता निवळली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर फिंगर ५ आणि फिंगर ६ मध्ये नावा उभ्या करण्याचे प्लॅटफॉर्म हटवण्यात आले आहेत. आता फिंगर ८च्या मागे या जेट्टी दिसतायत. फिंगर ४च्या आसपास असलेले चिनी सैनिक आता पूर्णतः मागे हटले आहेत.

4/4

भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका या चार देशांनी क्वाड्रीलॅटरल सिक्युरिटी डायलॉग किंवा 'क्वाड' हा गट स्थापन केला आहे. चीनचं बलाढ्य लष्कर आणि नौदलाचा हिंदी महासागरातला प्रभाव मोडून काढण्यासाठी हा गट स्थापन करण्यात आला आहे.