राज्यसभेच्या खासदारांना नेमका पगार किती असतो? कोणत्या सुविधा मिळतात?

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सध्या तयारी सुरु आहे. अशा स्थितीत सर्वसामान्यांच्या मनात या खासदारांना नेमका किती पगार असतो? तसंच कोणत्या सुविधा मिळतात? हा प्रश्न असतो. जाणून घ्या याची उत्तरं  

Feb 27, 2024, 18:45 PM IST
1/8

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सध्या तयारी सुरु आहे. अशा स्थितीत सर्वसामान्यांच्या मनात या खासदारांना नेमका किती पगार असतो? तसंच कोणत्या सुविधा मिळतात? हा प्रश्न असतो. जाणून घ्या याची उत्तरं  

2/8

राज्यसभेच्या खासदारांना महिन्याला 1 लाख रुपये पगार मिळतो. याशिवाय जर सदस्य आपल्या घरातूनच काम करत असतील तर दरदिवशी 2 हजारांचा भत्ता मिळतो.   

3/8

राज्यसभेशी संदर्भात कामासाठी सदस्य प्रवास करत असल्यास त्याचा खर्चही करावा लागत नाही. सदस्य विमान, रेल्वे किंवा कोणत्याही प्रकारे प्रवास करत असल्यास सरकार खर्च उचलतं.   

4/8

प्रत्येक सदस्याला एक फ्री पास मिळतो, ज्याच्या आधारे ते कोणत्याही ट्रेनने कोणत्याही वेळी मोफत प्रवास करु शकतात. या पासवर सदस्य वगळता इतर कोणी प्रवास करु शकत नाही.   

5/8

याशिवाय आणखी एक पास मिळतो ज्याच्या आधारे सदस्य आपली पत्नी किंवा सहकाऱ्यासह मोफत फर्स्ट एसीमधून प्रवास करु शकतात.   

6/8

राज्यसभा सदस्याला मतदारसंघ भत्ताही मिळतो. याशिवा सदस्याला निवासस्थान, वीज, पाणी, टेलिफोन आणि वैद्यकीय सुविधाही मिळतात.   

7/8

निवृत्त झाल्यानंतर राज्यसभा सदस्याला दरमहिना 25 हजारांची पेंशनही मिळते.   

8/8

जर एखादा 5 वर्षांपेक्षाही जास्त काळ सदस्य असेल तर प्रत्येक वर्षाच्या हिशोबाने पेंशनमध्ये 2 हजारांची वाढ होते. जर एखादा खासदार 10 वर्षांपेक्षा जास्त काळ सदस्य असेल तर त्याला 35 हजारांची पेंशन मिळते.