PHOTO: WhatsApp च हे नवं फीचर चुटकीसरशी देईल तुमच्या प्रश्नांची उत्तर..जाणून घेऊया कसं..

WhatsApp वर AI फीचरच्या मदतीने आपण व्हाटस्अॅपला कोणताही प्रश्न विचारुन माहिती मिळवू शकतो. आपण पाहिलं असेल की WhatsApp वर आता सर्चच्या इथे निळ्या रंगाची रिंग दिसते. हा नवीन गेम नाही तर व्हाटस्अॅपच नव AI फीचर आहे. या फीचरच्या मदतीने आपण व्हाटस्अॅपला कोणताही प्रश्न विचारु शकतो आणि आपल्याला काही सेकंदात त्या प्रश्नाच उत्तर मिळतं. हे फीचर मेटाने वापरकर्त्यांच्या मदतीसाठी बनवलं आहे.

Aug 22, 2024, 16:36 PM IST
1/5

उपयुक्त फीचर

 व्हाटस्अॅपचं हे रिंग फीचर अत्यंत उपयुक्त आहे.आपल्याला कोणत्याही गोष्टीविषयी माहिती मिळवायची असेल तर आपण या फीचरचा वापर करू शकतो. या फीचरचा उपयोग करून आपण कोणत्याही विषयावरील माहिती मिळवू शकतो.

2/5

इमेज बनवू शकतो

व्हाटस्अॅपचं हे मेटा एआई फीचर फक्त व्हाटस्अॅपवरचं नाही तर इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा पाहायला मिळतयं. यात एक चॅटबॅाक्स फीचर आहे.जे आर्टिफिशियल इंटेलीजेंस च्या मदतीने काम करतं.आपण यापासून इमेजसुद्धा बनवू शकतो.

3/5

कुठे मिळेल हे रिंग फीचर

हे फीचर मेटा एआई या नावाने ओळखल जातं.हे रिंग फीचर व्हाटस्अॅपच्या होम स्क्रीनवर मिळतं. हे फीचर होम स्क्रीनवर चॅट आयकॅानच्या वरती दिसतं.  हे निळ्या गोळ्यासारखं दिसतं.या गोळ्यावर क्लिक केल असता आपण मेटा एआई सोबत बोलू शकतो.

4/5

हे फीचर कशाप्रकारे काम करत

आपल्याला आपला प्रश्न, विषय टाईप करायचा आहे किंवा माईकवर बोलायचा आहे. आपण आपला प्रश्न विचारल्यानंतर काही सेकंदातच आपल्याला आपल्या प्रश्नाच उत्तर मिळेल.  

5/5

आपल्याला कोणत्याही प्रश्नाच उत्तर आता गुगलला विचारण्याची गरज नाही. व्हाटस्अॅपच हे एआई फीचर वापरण्यासाठी अत्यंत उपयुक्त असून अनेक भाषांत उपलब्ध आहे. उदारणार्थ आपण आपल्या घराच्या आजूबाजूची हॅाटेल्स आणि नामांकीत फिल्म्स शोधू शकतो.