इंडियन मार्केट काबिज करण्यासाठी चीनी कंपनीची मोठी चाल! स्मार्टफोन लाँच करताना गुपचूप सादर केली इलेक्ट्रीक कार

Xiaomi कंपनीने भारतात गुपचूप लाँच केली इलेक्ट्रीक कार

Jul 10, 2024, 23:46 PM IST

Xiaomi SU7 :  इंडियन मार्केट काबिज करण्यासाठी चीनी कंपनीने मोछी चाल खेळली आहे.  स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये भारतात दबदबा असणारी Xiaomi कंपनीने आता ऑटोमोबाईल क्षेत्रात पदार्पण केले आहे. Tesla च्या आधी Xiaomi कंपनीने भारतात Entry मारली आहे. Tesla च्या आधी Xiaomi कंपनी आपली  इलेक्ट्रीक कार भारतात लाँच केली आहे.  

1/7

Xiaomi कंपनीने स्मार्टफोन लाँच करताना गुपचूप आपली Xiaomi SU7 ही इलेक्ट्रीक कार भारतात सादर केली. 

2/7

बीजिंग ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री होल्डिंग कंपनी लिमिटेड (BAIC) यांच्याच्या मदतीने Xiaomi SU7 कारची निर्मीती केली आहे. 

3/7

 Xiaomi SU7 कार ही 4997 मिमी लांब, 1,963 मिमी रुंद आणि 1455 मिमी उंच आहे.  Xiaomi SU7 इलेक्ट्रिक सेडान कारमध्ये स्मार्टफोन प्रमाणे फेस रेकग्निशन लॉक/अनलॉक सिस्टीम देण्यात आली आहे.       

4/7

 बेस मॉडेलमध्ये 73.6kW  क्षमतेची बॅटरी आहे. यात 668 किमीपर्यंतची ड्रायव्हिग रेंज मिळते. तर, टॉप मॉडेलमध्ये 101kWh क्षमतेची बॅटरी आहे. यात सिंगल चार्जमध्ये 800 किमीची रेंज मिळेल असा दावा कंपनीने केला आहे.  

5/7

या कारच्या बेस मॉडेलचे वजन 1,980 किलो आहे. लोअर ट्रिमचा टॉप स्पीड 210 km प्रति तास असा आहे. टॉप मॉडेलचे वजन 2,205 किलो आहे . याचा टॉप स्पीड 265  km प्रति तास असा आहे. 

6/7

 Xiaomi SU7 इलेक्ट्रिक कारची स्टार्टिंग प्राईज 215,900 युआन ते 299,900 युआन म्हणजे भारतीय चलनानुसार  25 ते 30 लाख रुपये इतकी आहे. या कारची किंमत चीनमधील टेस्ला मॉडेल 3 पेक्षा कमी आहे.    

7/7

Xiaomi ने बेंगळुरू येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान Redmi 13 5G हा स्मार्टफोन लाँच केला. यावेळी कंपनीने  Xiaomi SU7 कार सादर केली.