'बाबू', 'शोना', 'जानू' नावाने कपल्स एकमेकांना का हाक मारतात? डॉक्टरांनीच सांगितलं कारण

Interesting Facts of Couples: तुम्ही सुद्धा प्रेमात पडलेली जोडपी एकमेकांना 'बाबू', 'शोना' किंवा 'जानू' नावाने हाक मारताना दिसतात. मात्र प्रेमात पडलेल्या व्यक्ती एकमेकांना हाका मारताना हे शब्द का वापरतात याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का? ही अशी टोपण नावं देण्यामागे एक खास कारण असून यासंदर्भातील खुलासा नुकताच एका डॉक्टरांनी केला आहे. काय म्हणालेत ते जाणून घेऊयात...

| Jun 07, 2023, 21:14 PM IST
1/12

Why Couple Calls Partner by nicknames like Babu Shona Jaanu

आपल्यापैकी अनेकांनी प्रेमात असलेली जोडपी एकमेकांना 'बाबू-शोना-जानू' नावांनी हाक मारताना ऐकलं असेल. अनेकदा हे ऐकणं फार मजेशीर वाटतं पण जोडपी एकमेकांना या अशा नावांनी का हात मारतात हे तुम्हाला ठाऊक आहे का? यासंदर्भातील कारण नुकतेच एका डॉक्टरांनी त्यांच्या व्हिडीओत सांगितलं आहे.

2/12

Why Couple Calls Partner by nicknames like Babu Shona Jaanu

युपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या अनेक संस्था आणि शिक्षक देशात आहेत. यापैकी काहीजण सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचं आणि सोशल मीडियावरील व्हायरल नाव म्हणजे डॉ. विकास दिव्यकीर्ति.

3/12

Why Couple Calls Partner by nicknames like Babu Shona Jaanu

डॉ. विकास हे मोटिव्हेशनल व्हिडीओ आणि रिल्समुळे सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यांचे इन्स्तावर 57 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. आपल्या व्हिडीओंमध्ये अनेकदा डॉ. विकास हे आयुष्यातील तसेच दैनंदिन जीवनातील गोष्टींबद्दलची रंकज माहिती देत असतात.

4/12

Why Couple Calls Partner by nicknames like Babu Shona Jaanu

नुकत्याच पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये डॉ. विकास यांनी एकमेकांच्या प्रेमात असलेले तरुण-तरुणी जोडीदाराला 'बाबू-शोना-जानू' नावाने का हाक मारतात याबद्दलची माहिती दिली आहे.

5/12

Why Couple Calls Partner by nicknames like Babu Shona Jaanu

"अनेकदा लोक अत्यंत भावनिक होतात तेव्हा एकमेकांना या नावांनी हाक मारतात. अशापद्धतीने बोलण्याची पद्धत 'भाव प्रेरित वक्रता' नावाने ओळखली जाते," असं डॉ. विकास म्हणाले.

6/12

Why Couple Calls Partner by nicknames like Babu Shona Jaanu

"अशा भावनिक वेळी व्यक्तीच्या मेंदूचा एक भाग सरळ बोलण्याच्या स्थितीत नसतो कारण त्यावेळी फार तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी वेगळे शब्द वापरण्याकडे कल असतो," असं डॉ. विकास म्हणाले. "अशा भावनिक क्षणी लोकांच्या तोंडून सरळ वाक्य किंवा शब्द निघत नाहीत," असंही डॉ. विकास यांनी सांगितलं.

7/12

Why Couple Calls Partner by nicknames like Babu Shona Jaanu

"भाव प्रेरित वक्रता म्हणजेच अत्यंत भावूक झाल्यानंतर तोंडून रोजच्या वापरतील शब्द न निघता वेगळ्याच शब्दांचा वापर करण्याचा कल असण्याची स्थिती," असं डॉ. विकास म्हणाले.

8/12

Why Couple Calls Partner by nicknames like Babu Shona Jaanu

वाक्यांमधील वक्रता म्हणजे थेट आणि सरळ न बोलता गोलगोल फिरुन आपलं म्हणणं मांडणं. यामध्येही बोलण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली पद्धत म्हणजे भावनेनं प्रेरित आणि दुसरी बुद्धीने प्रेरित असते.

9/12

Why Couple Calls Partner by nicknames like Babu Shona Jaanu

भावना उचंबळून आल्यानंतर त्या व्यक्त करण्यासाठी व्यक्ती रोजच्या वापरातील शब्दांऐवजी अधिक प्रेमळ आणि कधी तरीच वापरले जाणारे शब्द उच्चारतात.

10/12

Why Couple Calls Partner by nicknames like Babu Shona Jaanu

जेव्हा एखादी व्यक्ती भावनेच्या भरात बोलते आणि समोरच्या व्यक्तीबद्दल प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा तिला साधे शब्द वापरता येत नाही. अशावेळेस रोजच्या वापरातील शब्दांऐवजी भावनिक शब्दांना प्राधान्य असतं. म्हणूनच भावनिक झालेली आई ज्याप्रमाणे आपल्या मुलाला वेगवेगळ्या नावाने हाका मारते तसेच प्रेमात असलेल्या जोडप्यांबरोबर होतं. 

11/12

Why Couple Calls Partner by nicknames like Babu Shona Jaanu

यासंदर्भातील उदाहरण देताना डॉ. विकास यांनी, तुमच्यासमोर एखादं गुटगुटीत बाळ आलं तर तुम्ही त्याच्याशी तोडक्यामोडक्या शब्दांमध्ये बोलाल. असेच काहीसे प्रेमात पडलेल्या जोडप्यांबरोबर होतं असं डॉ. विकास म्हणाले. 

12/12

Why Couple Calls Partner by nicknames like Babu Shona Jaanu

"प्रेमात पडल्यानंतर जोडपी आधी आपल्या जोडीदाराला टोपणनाव देतात. यामध्येच 'बाबू-शोना-जानू' या नावांचा समावेश असतो. जेव्हा नातं फार इमोशनल लेव्हललं असतं तेव्हा मूळ नावं वापरली जात नाहीत," असं डॉ. विकास म्हणाले. याच कारणांमुळे प्रेमी जोडपी एकमेकांना 'बाबू-शोना-जानू' नावांनी हाका मारतात.