PHOTOS: Vladimir Putin चालताना एक हात कधीच हालवत नाहीत, नेमकं काय आहे गूढ? उत्तर वाचून आश्चर्य वाटेल

Vladimir Putin News: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आपल्या निर्णयांमुळे नेहमीच चर्चेत असतात. मग युक्रेनविरोधात पुकारलेलं युद्ध असो किंवा पुन्हा राष्ट्राध्यक्षपद्धी निवड असो. पण याशिवाय पुतीन आपल्या चालण्याच्या स्टाइलमुळेही चर्चेत असतात. तुम्हीही पुतीन यांना चालताना पाहिलं तर सर्वसामान्यांपेक्षा ती वेगळी असल्याचं तुमच्या लक्षात येईल. चालताना डाव्या हाताच्या तुलनेत त्यांचा उजवा हात जास्त हालत नाही. पण यामागे काही गूढ आहे की कोणता आजार? जाणून घ्या.   

Feb 03, 2023, 15:47 PM IST
1/5

तुम्ही रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना चालताना पाहिलं तर डाव्या हाताच्या तुलनेत उजवा हात जास्त हालचाल करत नाही. यामुळे पुतीन यांना कोणता आजार आहे की, आधीपासूनच ते असे चालतात हा प्रश्न निर्माण होतो. जाणून घ्या नेमकं यामागे काय कारण आहे. (Photo: AP)  

2/5

पुतीन चालताना त्यांचा उजवा हात एकाच स्थानी असतो. पण यामागे कोणताही आजार नाही तर ट्रेनिंग कारणीभूत आहे. पुतीन रशियाची गुप्तचर यंत्रणा केजेबीमध्ये कार्यरत असताना त्यांना हे प्रशिक्षण मिळालं होतं. (Photo: AP)  

3/5

केजीबी रशियाची गुप्तचर यंत्रणा केजीबीचा भाग होते. केजीबीत फार काळ सेवेत असणारे अनेकजण अशाच प्रकारे चालतात. अशाप्रकारे चालल्याने कोणताही हल्ला झाल्यास ती व्यक्ती लगेच शस्त्र बाहेर काढून त्याचा सामना करु शकतात, तसंच कोणत्याही स्थितीचा सहजपणे सामना करु शकतात. यामुळेच पुतीन असेल चालतात. त्यांना कोणताही आजार नसून ते फिट आहेत. (Photo: AP)  

4/5

पुतीन फार कमी वेळा आपला उजवा हात हलवताना दिसतात. याला स्लिंगर स्टाइल असं म्हणतात. कारण केजेबीत कार्यरत असणाऱ्यांचा उजवा हात नेहमी शस्त्राजवळ असतो. (Photo: AP)  

5/5

केजीबीमधील सदस्यांना नेहमी आपला उजवा हात शस्त्राजवळ ठेवण्यास आणि डाव्या हाताने पुढे चालण्यास सांगितलं जातं. (Photo: AP)