बिअरच्या बाटलीचे टोपण व्हिस्की किंवा वाईनपेक्षा वेगळे का असते? कारण वाचून आश्चर्यचकित व्हाल

बिअरच्या बाटलीचे टोपण हे व्हिस्की किंवा वाईनच्या बाटलीसारखे का नसते हे तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या सविस्तर

| Sep 06, 2024, 17:31 PM IST
1/6

स्टॉपर्स किंवा कॉर्क

बिअर, व्हिस्की आणि वाईनच्या बाटल्यांमध्ये वेगवेगळ्या सामग्रीमुळे वेगवेगळ्या कॅप्स असतात. बिअर कॅप्स सामान्यत: फ्लेक्स मेटल असतात. तर व्हिस्की आणि वाईन बाटलीच्या कॅप्समध्ये अनेकदा स्टॉपर्स किंवा कॉर्क असतात. 

2/6

कार्बन डाइऑक्साइड

बिअरच्या बाटल्यांमध्ये कार्बन डाइऑक्साइड असतो. कारण बिअर कार्बनयुक्त असते. कार्बोनेशन हा कार्बन डाइऑक्साइड वायू आहे. जो द्रवामध्ये विरघळतो. ज्यामुळे बिअरमध्ये बुडबुडे येतात. त्यामुळे एकदा बिअरची बाटली उघडली की ती लवकर संपवणे महत्त्वाचे असते. अन्यथा त्याची चव काही वेळाने बदलते.   

3/6

घट्ट सील

पूर्वी बिअरच्या बाटल्या कॉर्कसह येत होत्या. पण त्यांना उघडणे कठीण होते. म्हणून, घट्ट सील करण्यासाठी दातासारखे असलेले झाकण स्थापित केले जाऊ लागले. 

4/6

कॉर्कने सीलबंद

अनेकदा असं म्हटलं जात होते की, कॉर्कने सीलबंद केलेल्या बाटल्यांमध्ये अनेकदा द्रव आणि कार्बोनेटेड वायू बाहेर पडतात. त्यामुळे स्टीलचे झाकण बसवले जाऊ लागले. 

5/6

स्टीलचे झाकण

त्यामुळे या प्रकारचे झाकण काचेच्या बाटल्यांवर लावले जात होते. परंतु ते प्लास्टिकच्या बाटल्यांवर इतके चांगले कार्य करत नाही. 

6/6

प्लास्टिकच्या टोपण

म्हणून, काचेच्या बाटल्यांमध्ये दातासारखा असलेला स्टील कॉर्क वापरला जातो आणि प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये फक्त प्लास्टिकच्या टोपण वापरले जाते.