Ashadhi Wari2024: विठ्ठालाच्या भाळी चंदनाचा टिळा का असतो, काय सांगतं शास्त्र ?

हिंदू संस्कृतीत विठ्ठलाच्या कपाळी असलेल्या टिळ्याला खुप मोठं महत्त्व आहे. हिंदू शास्त्रात विठ्ठलाच्या टिळ्याचा अर्थ सांगितला आहे. 

Jul 10, 2024, 13:11 PM IST

हिंदू संस्कृतीत भाळी टिळा लावण्याला खूप महत्त्व दिलं जातं. मंदिरात गेल्यावर अनेक भाविक श्रद्धेने कपाळी टिळा लावतात. तसंच काही जण कपाळी टिळा लावल्याशिवाय घराबाहेर पडत नाही.  

1/11

काही जण कपाळी टिळा लावल्याशिवाय घराबाहेर पडत नाही.  त्यामुळे धार्मिकदृष्ट्या हळद, कुंकू, अष्टगंध आणि चंदनाला खूप पवित्र मानलं जातं.

2/11

अध्यात्माप्रमाणे वैज्ञानिकदृष्ट्या देखील कपाळी टिळा लावण्याचे  खूप फायदे आहेत.  

3/11

चंदनचा गुणघर्म थंड असतो त्यामुळे दोन भुवयांच्या मध्ये चंदनाचा टिळा लावल्याने डोकं शांत राहतं. 

4/11

हळद, कुंकू, अष्टगंध,अबीर आणि चंदन हे जंतूनाशक असल्याने कपाळी लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. 

5/11

जर तुम्हाला मानसिक ताण तणाव जाणवत असेल तर कपाळी चंदन लावल्याने मन शांत राहतं. 

6/11

पंढरपुरच्या पांडुरंगांच्या भाळी अबीर आणि चंदनाचा टिळा लावला जातो. पूर्ण कपाळापासून ते नाकापर्यंत हा  विठ्ठलाचा टिळा कायमच आकर्षक वाटतो. 

7/11

असं म्हणतात की, विष्णू क्षीरसागरात शेष नागावर आराम करायचे. जेव्हा विष्णुंनी पांडुरंगाचा अवतार धारण केला, त्यावेळी शेषनागाला त्यांनी चंदनाच्या टिळ्यामधून मस्तकी धारण केलं अशी आख्यायिका सांगितली जाते.   

8/11

विठ्ठलाच्या भाळी असलेल्या टिळ्याच्या आकार हा शेषनागागाचा असल्याचं म्हटलं जातं.   

9/11

अबीर आणि चंदनाच्या टिळ्यामधून पांडुरंग अवतारात विष्णुंनी शेषनागाला त्यांच्या जवळचं स्थान दिलं. 

10/11

अबीर आणि चंदनाच्या टिळ्यामधून पांडुरंग अवतारात विष्णुंनी शेषनागाला त्यांच्या जवळचं स्थान दिलं. 

11/11

शेषनागाची देवांप्रती असलेली निष्ठा पाहून विष्णुंनी विठ्ठल अवतारात त्याला मस्तकी धारण केलं,असं म्हटलं जातं.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)