2 लाखांचा साबण नेमका कसा असतो? यात सोनं असतं की काय?

जगातील सर्वात महागडा साबण जो सोनं आणि हिऱ्यापासून तयार करण्यात आला आहे. याची किंमत दोन लाखांच्या आसपास आहे. 

Oct 11, 2023, 23:07 PM IST

World's Most Expensive Soap: कपडे, घड्याळ या सारख्या असंख्य महागड्या वस्तु जगात आहेत. मात्र, कधी महागडा साबण पाहिला आहे का? या याबणाची किंमत दोन लाखांपेक्षा जास्त आहे. हा जगातील सर्वात महागडा साबण आहे. असं काय आहे या साबणामध्ये.

1/7

उत्तर लेबनॉनमधील त्रिपोली शहरात जगातील हा सर्वात महागडा साबण मिळतो. या साबणाची किंमत 2,800 डॉलर म्हणजेच जवळपास  2,07,800 रुपये इतकी आहे. 

2/7

24 कॅरेट सोनं आणि हिऱ्याची पावडर तसेच विविध औषधी तेलांचा वापर करुन हा साबण तयार करण्यात आला आहे.   

3/7

जगातील सर्वात महागडा साबण सुरुवातीला चीजच्या तुकड्यासारखा दिसत होता. नंतर त्याच्या डिझाइनमध्ये लक्षणीय बदल करण्यात आले.

4/7

जगातील सर्वात महाग साबण पहिल्यांदा 2013 मध्ये बनवण्यात आला होता.  

5/7

हा लक्झरी साबण UAE च्या काही निवडक दुकानांमध्ये विकला जातो.

6/7

15 व्या शतकापासून साबण बनवल्याचा दावा हसन अँड सन्स या कंपनीने केला आहे. 

7/7

जगातील सर्वात महागड्या साबणाचे नाव खान अल सबौन असे आहे.  बदर हसन अँड सन्स या कंपनीहा साबण तयार केला आहे.