विमानच्या वेगाने धावणाऱ्या जगातल्या 'या' सुपरफास्ट ट्रेन तुम्हाला माहितेय का ?

लोकलचा आणि सुपरफास्ट मेलचा प्रवास हा प्रत्येकाने कधी न कधी अनुभवलेला असतो. वंदे भारत एक्सप्रेसला भारतीयांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली. पण तुम्हाला' या' जगातील सुपरफास्ट एक्सप्रेस माहितेय का ? चला तर मग जाणून घेऊयात.   

Feb 17, 2024, 20:02 PM IST
1/7

CR400 ‘Fuxing

युरोप आणि जपानच्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ही चीनमधली सर्वात सुपरफास्ट ट्रेनपैकी एक आहे. असं म्हटलं जातं की, ही ट्रेन  350 किलोमीटर ताशी वेगाने धावत असली तरी 420 किलोमीटर ताशी वेगाने सुद्धा या ट्रेनला चालवण्यात आलं आहे. 

2/7

Shanghai Maglev

ही एक्सप्रेस ताशी 460 किलोमीटर धावते. ही एक्सप्रेस  30 किलोमीटर अंतर केवळ 7 मिनिटांत पार करते. जर ही ट्रेन भारतात असती तर दिल्ली ते पाटणा हे अंतर केवळ दोन तासात पार केले असते.  चीन बनावटीची ही ट्रेन पारंपारीक रेल्वे ट्रॅकवर धावत नाही. या वेगवान ट्रेनला धावण्यासाठी चुंबकीय बळ मोठ्या प्रमाणात लागते. चीनमधल्या वेगवान ट्रेनपैकी ही एक ट्रेन आहे. 

3/7

ICE3

ही जर्मनमधली सर्वात वेगवान ट्रेन आहे. 300 किलोमीटर ताशी वेगाने ही ट्रेन धावते. असं म्हणतात की, जेव्हा काही कारणाने  या ट्रेनला पोहोचायला उशीर होतो तेव्हा ती अधिक वेगाने म्हणजेच  ताशी 330 किलोमीटर वेगाने धावते.    

4/7

TGV

फ्रान्सने 2007 मध्ये युरोपकडून या ट्रेनला विकत घेतलं. सर्वसाधारणपणे ही ट्रेन ताशी 320 किलोमीटर अंतर पार करते. 

5/7

JR East E5

या  ट्रेनचा ताशी वेग  320 किलोमीटर आहे. अॅल्युमिनियम हे वजनाला हलकं असतं , त्यामुळे ही जपानी  ट्रेन पुर्णपणे अॅल्युमिनियमयुक्त असल्याने ती सर्वात वेगवान धावण्यास मदत होते. 

6/7

Al Boraq

अफ्रीकेमधील या ट्रेनचा ताशी 320 किलोमीटर इतका वेग आहे. असं म्हणतात फ्रांसच्या  TGV या ट्रेनचा अभ्यास करून Al Boraq एक्सप्रेस बनविण्यात आली.

7/7

Trenitalia ETR1000

 इटलीमधील ही ट्रेन ताशी 300 किलोमीटर अंतर पार करते. 2017 मध्ये ही ट्रेन पहिल्यांदा धावली.