कोरोना तर आहेच त्यात अवकाळीचाही तडाखा; गारपीटीने आंब्याला मोठा फटका

अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान होत आहे

Updated: May 3, 2021, 10:41 AM IST
कोरोना तर आहेच त्यात अवकाळीचाही तडाखा; गारपीटीने आंब्याला मोठा फटका title=

पुणे : एकीकडे कोरोना संकट थैमान घालत असताना दुसरीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान सुरू केले आहे. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान होत आहे. पुण्यातील भोर तालुक्यात अवकाळीमुळे आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे.

जिल्ह्यातील भोर - वेल्हा तालुक्यांत अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वारा आणि गारपीटीमुळे आंब्यांचा सडा टाकल्याप्रमाणे आंबे जमिनीवर पडल्याचे चित्र दिसून येत आहे.

अनेक ठिकाणी आंब्याच्या झाडांची पडझड झाल्याचेही दिसून आले आहे. आंबा पिकासह रानमेवा समजली जाणाऱ्या फळांना देखील अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेले करवंद, आळु, जांभुळ या पिकांचे पावसाने नुकसान केले आहे.

कोरोनामुळे आधीच आर्थिक  गाडा सुरळीत नसलेल्या बळीराज्याच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.