पुणे : संशोधन आणि विकास नावीन्यपूर्ण प्रयोगशाळेतील सेंटियंट लॅबमध्ये(Sentient Labs) बुधवारी पुण्यात भारतातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या हायड्रोजन फ्युएल सेल बसचे उद्घाटन केले.
यावेळी प्रसंगी ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर, एनसीएलचे संचालक डॉ. आशिष लेले, लॅबचे अध्यक्ष रवी पंडित आदी उपस्थित होते. स्वच्छ इंधनाचा पर्याय म्हणून हायड्रोजन इंधन (hydrogen fuel) घटाकडे पाहिले जात असून, जगभरात यावर संशोधन आणि प्रयोग चालू आहे. बुधवारी झालेल्या या कार्यक्रमात सहा चाकी ३२ आसनांची बस सादर करण्यात आली.
CSIR, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आणि केंद्रीय इलेक्ट्रोकेमिकल रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्याने केपीआयटीच्या Sentient Labsने हायड्रोजन इंधन सेल तंत्रज्ञानावर विकसित बसची निर्मिती केली.
''हायड्रोजन-संचालित तंत्रज्ञानावर भर देऊन शाश्वत पर्याय निर्माण करणे हे Sentient Labsचे ध्येय आहे. बॅटरी तंत्रज्ञान, इंधन सेल तंत्रज्ञान आणि हायड्रोजन निर्मितीसाठी तंत्रज्ञानातील येणाऱ्या अडथळ्यांचा आम्ही शोध घेतला आहे,” असे Sentient Labsने जारी केलेल्या प्रेसमध्ये म्हटले आहे.
अलीकडेच, Sentient Labsने जगातील पहिले तंत्रज्ञान (world’s first technology) जाहीर केले होते. जे इंधन सेलवर चालणाऱ्या वाहनांमध्ये वापरण्यासाठी थेट शेतातील पिकांच्या उरलेल्या अवशेषापासून हायड्रोजन तयार करते. हे तंत्रज्ञान शाश्वत इंधनाच्या प्रयत्नांचे पुढचे पाऊल आहे.
इतर घटक
हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञानाव्यतिरिक्त, सेंटिंट लॅब्सने इतर प्रमुख घटक जसे की प्लांटचे संतुलन, पॉवरट्रेन आणि बॅटरी पॅक देखील स्वदेशी डिझाइन आणि विकसित केले आहेत.
हे सर्व घटक 9 मीटर, 32 आसनी, वातानुकूलित बसमध्ये तैनात करण्यात आले आहेत. 30 किलो हायड्रोजन वापरताना 450 किमीची रेंज प्रदान करण्यासाठी हे डिझाइन केले आहे. मॉड्यूलर आर्किटेक्चर रेंज आणि ऑपरेटिंग परिस्थितीच्या आवश्यकतांनुसार डिझाइनमध्ये बदल करता येतात.
बस चालवण्यासाठी इंधन सेल हायड्रोजन आणि हवेचा वापर करून वीज निर्माण करते. त्यामुळे ते वाहतुकीचे पर्यावरणास अनुकूल साधन बनते.