आसाममध्ये अडकलेल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांची अखेर सूटका; लवकरच राज्यात परतणार

Maharashtrian students stranded in Assam finally released : आसाम रायफल बटालियनच्या परीक्षेसाठी आसाममध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील साठ विद्यार्थ्यांना सक्तीचं क्वारंटाईन करण्यात आलं होतं

Updated: Jan 16, 2022, 11:31 AM IST
आसाममध्ये अडकलेल्या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांची अखेर सूटका; लवकरच राज्यात परतणार title=

सागर आव्हाड, पुणे : आसाम रायफल बटालियनच्या परीक्षेसाठी आसाममध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील साठ विद्यार्थ्यांना सक्तीचं क्वारंटाईन करण्यात आलं होतं. त्यानंतर राज्य प्रशासनाने तत्काळ त्याची दखल घेत विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. दरम्यान, आसाम मध्ये अडकलेल्या सर्व मुलांची अखेर सुटका करण्यात आली आहे. रुग्णालयातून सर्व मुलांना आसाम सरकारने काल संध्याकाळी सोडलं असल्याची प्रशासनाने दिली आहे. सर्व मुलं सध्या न्यू हॉकलॉगच्या रेल्वे स्टेशनवरून गुवाहाटीला जाणार असून तेथून ते आज रेल्वेनं महाराष्ट्राकडे येणाऱ्या ट्रेनमध्ये बसणार आहेत.

कोल्हापूर आणि पुणे येथील 60 विद्यार्थी इलेव्हन आसाम रायफल बटालियनच्या परीक्षेसाठी आसामला गेले होते. ट्रेडमॅनपदाच्या 6 जागांसाठी 12 ते 18 जानेवारी दरम्यान ही परीक्षा होणार होती. या परीक्षेसाठी हे सर्व विद्यार्थी 1 ते 7 जानेवारी दरम्यान आसामला पोहोचले.

आसाम येथे पोहोचल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी न करता त्यांना थेट QUARANTIN करण्यात आलं. दरम्यानच्या काळात कोरोनामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली होती.