महापालिका निवडणुका का पुढे ढकलल्या? Raj Thackeray यांनी केला खुलासा

Raj Thackeray speech in Pune : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलंय. सत्ताधारी आणि विरोधकांवर त्यांनी जोरदार टीका केलीये.

Updated: Mar 9, 2022, 08:41 PM IST
महापालिका निवडणुका का पुढे ढकलल्या? Raj Thackeray यांनी केला खुलासा title=

पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मनसेच्या (MNS) वर्धापनदिनाचा निमित्ताने कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना आज विविध मुद्द्यांवर वक्तव्य केलं. महापालिका निवडणुकांबाबत त्यांनी मोठं वक्तव्य केलं. राज्यात कोविडमुळे अनेक महापालिका निवडणुका झालेल्या नाहीत. अनेक महत्त्वाच्या महापालिकांचा कार्यकार्य संपून अनेक महिने झाले आहेत.

राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीबाबत बोलताना सरकारवर गंभीर टीका केलीये. राज ठाकरे म्हणाले की, मी सतत सांगत होतो निवडणुका मार्चमध्ये होणार नाहीत. निवडणूक आली की ती चढायला लागते. याचा अर्थ काय हे कळालं असेल तुम्हाला. ती स्पर्श करते. निवडणूक वातावरणात दिसते. पण ती आता दिसत नाही. आता ओबीसी समाजाचं कारण पुढे केलं. सगळं झूट आहे. यांना निवडणूक घ्यायच्याच नव्हत्या.'

राज ठाकरे पुढे म्हणाले की, 'मला कोणाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं नाहीये, आरोग्याबद्दल बोलायचं नाहीये. मुख्यमंत्र्यांची तब्येत चांगली नाहीये. पण खरं कारण ते आहे. 3 महिने निवडणुका पुढे ढकलतो आहे. म्हणजे जूनपर्यंत. नंतर पाऊस सुरु होईल. घेणार आहेत का निवडणुका? पण लोकांना निवडणुका हव्या आहेत का? कानोसा घ्या. लोकांना कोणतंही देणं- घेणं नाही. फक्त उभे राहणाऱ्यांमध्येच उत्साह आहे.'

'निवडणुका होऊच नयेत. कारभार पण हातात आणि प्रशासक पण हातामध्ये. सगळं आम्हीच बघणार. 2 वर्षापासून लोकं घरात आहेत. कोणाला ही निवडणुकीमध्ये काहीही पडलेलं नाहीये. परीक्षेनंतर सगळे बाहेर निघून जातील. मग मत मागायला जाणार कोणाकडे?. त्यामुळे निवडणुका दिवाळीनंतरच होतील. असं भाकीत राज ठाकरे यांनी केलं आहे.