पिंपरीच्या YCM रुग्णालयातून कोरोनाचे रौद्र रुप समोर; जमिनीवर झोपवून रुग्णांवर उपचार

 राज्यातील मेट्रो शहरांमध्ये वाढत चाललेले थैमान चिंताजनक आहे

Updated: Apr 13, 2021, 09:21 AM IST
पिंपरीच्या YCM रुग्णालयातून कोरोनाचे रौद्र रुप समोर;  जमिनीवर झोपवून रुग्णांवर उपचार  title=

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी - चिंचवड : कोरोना संसर्ग दिवसेंदिवस रौद्र रुप धारण करीत आहे. राज्यातील मेट्रो शहरांमध्ये वाढत चाललेले थैमान चिंताजनक आहे. पिंपरी-चिंचवड सारख्या अत्याधुनिक आणि विकसित शहरातदेखील रुग्णांच्या प्रचंड वाढीमुळे आरोग्यव्यवस्था कोलमडल्याचे चित्र आहे.  महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण मेमोरिअल रूग्णालयातील भीषण परिस्थिती समोर आली आहे.
 
 पुण्याच्या लगतच्या पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. शहरातील अत्याधुनिक अशा YCM रुग्णालयात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही दिवस रुग्णांना रुग्णालयाच्या बाहेर मंडपात बेड टाकून उपचार दिले जात होते. आता तर इतकी भीषण परिस्थिती ओढाली आहे. की रुग्णांना अक्षरश: जमिनीवर झोपवून उपचार द्यावे लागत आहेत.
 
गेल्या कित्येक वर्षात शहरात अशी भयानक स्तिथी आली नव्हती असे डॉक्टर सांगत आहेत. त्यामुळे नागरिकांनी  काळजी घ्यावी असे आवाहन केले जातेय रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टर अथक प्रयत्न करीत असले तरी, मोठ्या प्रमाणात होणाऱ्या संसर्गामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे.