मुंबई : पाऊस सुरू झालाय... झाडांना पालवी फुटू लागलीय... सगळीकडे हिरवळ दिसू लागलीय... वातावरणात गारवा आलाय... लेखकांच्या लेखणीनं वेग धरलाय... कवींना कविता सुचू लागल्यात... सांगायचं काय तर प्रेमाचा मौसम सुरू झालाय... सगळीकडे प्रेम... प्रेम... आणि प्रेमच... पण, तुमच्या-आमच्या 'प्रेमाचं भविष्य' काय? तुम्हीही प्रेमात पडला असाल... कुठपर्यंत होणार तुमच्या प्रेमाचा प्रवास... जाणून घेऊयात 'प्रेमाचं भविष्य'मधून...
साथीदाराशी सर्वच आवडी निवडी जुळणार नाहीत
योग्य शब्द वापरा, जोडीदाराला दुखवू नका
तुमच्या पर्सनॅलिटीकडे लक्ष द्या, प्रभावी करा
मित्रमंडळीचं सर्वच ऐकू नका, यात फटका बसेल.
जोडीदाराशी स्पेस नक्कीच मेन्टेन करा.
आजचं भांडणं, दिवस संपवण्याआधी मिटवा
मूड स्विंग सांभाळणं तारेवरची कसरत.
गप्पांसाठी निवांत संध्याकाळ घालवा
छानंस गाणं, शायरी जोडीदाराला पाठवा
थँक्यू, सॉरी, प्रोत्साहनपर शब्द आज वापरा
जोडीदार कितीही आवडीचा असला तरी...
खर्च करण्याआधी, स्वत:चा खिसा नक्की तपासा
पैशाचं सोंग करता येत नाही, हे लक्षात ठेवा
आवडत्या व्यक्तीत जोडीदाराचा शोध सुरू राहिल
योग्य जोडीदार मिळेल, अतिघाई महागात पडेल
किती दिवस प्रोफाईल पाहत राहणार
आज मनाशी ठरवून फोन कराच
जोडीदारासोबत खुले आम फिरणं टाळा
तुमचा प्लान आज फसण्याची शक्यताय.
सुट्टीचा दिवस असला तरी, जोडीने सिनेमा पाहणं टाळा
सीसीटीव्हीपेक्षा लोकांचीच नजर तुमच्यावर जास्तंय
तुमचे अंदाज इतर वेळी खरे ठरत असतील..पण..
प्रेमात तुमचे अंदाज आज हमखास फसतील