`बॉलिवूड`मधल्या तुटलेल्या वचनांच्या कहाण्या!

Dec 15, 2013, 15:26 PM IST
1/7

गीतकार गुलजार आणि अभिनेत्री राखी गुलजारगुलजार आणि राखी यांनी लग्न केले. त्यानंतर त्यांना एक मुलगी झाला... मेघना... पण, मेघना एक वर्षांची असतानाच या दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

गीतकार गुलजार आणि अभिनेत्री राखी गुलजार

गुलजार आणि राखी यांनी लग्न केले. त्यानंतर त्यांना एक मुलगी झाला... मेघना... पण, मेघना एक वर्षांची असतानाच या दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

2/7

राजेश खन्ना आणि डिंपल कपाडियाराजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांचे लग्न १९७३ साली झाले. त्यानंतर अनेक वेळा त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर येत होत्या... कायदेशीर घटस्फोट घेतला नसला तरी या दोघांचे रस्ते खन्ना यांच्या मृत्यूच्या कित्येक वर्ष अगोदरपासूनच वेगवेगळे झाले होते. राजेश-डिंपल यांना रिंकी आणि ट्टिंकल या दोन मुली आहेत.

राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया

राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांचे लग्न १९७३ साली झाले. त्यानंतर अनेक वेळा त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर येत होत्या... कायदेशीर घटस्फोट घेतला नसला तरी या दोघांचे रस्ते खन्ना यांच्या मृत्यूच्या कित्येक वर्ष अगोदरपासूनच वेगवेगळे झाले होते. राजेश-डिंपल यांना रिंकी आणि ट्टिंकल या दोन मुली आहेत.

3/7

सैफ अली खान आणि अमृता सिंगआपल्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या अमृता सिंग हिच्यासोबत सैफनं प्रेमविवाह केला होता. परंतु, हे लग्न काही टिकू शकलं नाही. २००४ साली सैफ – अमृतानं घटस्फोट घेतला. सैफ-अमृताला सारा आणि इब्राहिम अशी दोन मुलंही आहेत. त्यानंतर २०१२ मध्ये मात्र सैफनं अभिनेत्री करीना कपूर हिच्याशी विवाह केला.

सैफ अली खान आणि अमृता सिंग

आपल्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या अमृता सिंग हिच्यासोबत सैफनं प्रेमविवाह केला होता. परंतु, हे लग्न काही टिकू शकलं नाही. २००४ साली सैफ – अमृतानं घटस्फोट घेतला. सैफ-अमृताला सारा आणि इब्राहिम अशी दोन मुलंही आहेत. त्यानंतर २०१२ मध्ये मात्र सैफनं अभिनेत्री करीना कपूर हिच्याशी विवाह केला.

4/7

आमिर खान आणि रिना दत्तबॉलिवूड परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणाऱ्या आमिरनं २००२ साली त्याची पहिली पत्नी रिना दत्त हिच्याशी घटस्फोट घेतला. ‘लगान’ चित्रपटाची सहनिर्माती किरण राव हिच्याशी असलेले प्रेमसंबंध हे लग्न तुटण्यास कारणीभूत ठरले होते. रिनाशी घटस्फोट घेतल्यानंतर २००५ साली आमिरनं किरण हिच्यासोबत लग्नाची गाठ बांधली. आमिर आणि रिना यांना जुनैद आणि इरा अशी दोन मुलं आहेत. तर आमिर आणि किरण यांना आझाद नावाचा मुलगा आहे.

आमिर खान आणि रिना दत्त

बॉलिवूड परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणाऱ्या आमिरनं २००२ साली त्याची पहिली पत्नी रिना दत्त हिच्याशी घटस्फोट घेतला. ‘लगान’ चित्रपटाची सहनिर्माती किरण राव हिच्याशी असलेले प्रेमसंबंध हे लग्न तुटण्यास कारणीभूत ठरले होते. रिनाशी घटस्फोट घेतल्यानंतर २००५ साली आमिरनं किरण हिच्यासोबत लग्नाची गाठ बांधली. आमिर आणि रिना यांना जुनैद आणि इरा अशी दोन मुलं आहेत. तर आमिर आणि किरण यांना आझाद नावाचा मुलगा आहे.

5/7

चित्रांगदा सिंग आणि ज्योती रंधावाअभिनेत्री चित्रांगदा सिंह आणि गोल्फ खेळाडू ज्योती रंधावा यांनी २००१ साली लग्नगाठ बांधली. हे जोडप्यालाही आता एकमेकांपासून वेगळं व्हायचंय... त्यांची घटस्फोट घेण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सध्या सुरू आहे.

चित्रांगदा सिंग आणि ज्योती रंधावा

अभिनेत्री चित्रांगदा सिंह आणि गोल्फ खेळाडू ज्योती रंधावा यांनी २००१ साली लग्नगाठ बांधली. हे जोडप्यालाही आता एकमेकांपासून वेगळं व्हायचंय... त्यांची घटस्फोट घेण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सध्या सुरू आहे.

6/7

अनुराग कश्यप आणि कल्की कोचलिनअनुराग आणि कल्की यांच्या घटस्फोटाचीही बॉलिवूड वर्तुळात बरीच चर्चा सुरू आहे. हे लग्नही घटस्फोटाच्या उंबरठ्यावर पोहचलंय... कायदेशीर घटस्फोट मिळवण्याआधीच त्यांनी एकमेकांपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतलाय. दोघांचेही मार्ग आता वेगळे झालेत.

अनुराग कश्यप आणि कल्की कोचलिन

अनुराग आणि कल्की यांच्या घटस्फोटाचीही बॉलिवूड वर्तुळात बरीच चर्चा सुरू आहे. हे लग्नही घटस्फोटाच्या उंबरठ्यावर पोहचलंय... कायदेशीर घटस्फोट मिळवण्याआधीच त्यांनी एकमेकांपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतलाय. दोघांचेही मार्ग आता वेगळे झालेत.

7/7

हृतिक रोशन आणि सुझान रोशनहृतिक आणि सुझान रोशन यांनी नुकतंच आपण घटस्फोट घेणार असल्याचं जाहीर केलंय. लग्नाच्या तब्बल १३ वर्षानंतर त्यांना एकमेकांपासून वेगळं व्हायचंय... विशेष म्हणजे लग्नाअगोदरही चार वर्ष ते एकमेकांना ‘डेट’ करत होते. हृतिक आणि सुझान यांना रिहान आणि रिधान नावाची दोन मुलंही आहेत.पण, हृतिक आणि सुझान ही काही बॉलिवूडमधली घटस्फोट घेणारी पहिली जोडी नाही. याआधीही, अनेक सेलिब्रिटी जोडप्यांची घटस्फोटाची प्रकरणं अशीच चर्चिली गेली... एक नजर टाकुयात अशाच काही जोड्यांवर...

हृतिक रोशन आणि सुझान रोशन

हृतिक आणि सुझान रोशन यांनी नुकतंच आपण घटस्फोट घेणार असल्याचं जाहीर केलंय. लग्नाच्या तब्बल १३ वर्षानंतर त्यांना एकमेकांपासून वेगळं व्हायचंय... विशेष म्हणजे लग्नाअगोदरही चार वर्ष ते एकमेकांना ‘डेट’ करत होते. हृतिक आणि सुझान यांना रिहान आणि रिधान नावाची दोन मुलंही आहेत.

पण, हृतिक आणि सुझान ही काही बॉलिवूडमधली घटस्फोट घेणारी पहिली जोडी नाही. याआधीही, अनेक सेलिब्रिटी जोडप्यांची घटस्फोटाची प्रकरणं अशीच चर्चिली गेली...

एक नजर टाकुयात अशाच काही जोड्यांवर...