मराठमोळा शाही लग्न सोहळा

Dec 08, 2012, 22:02 PM IST
1/5

राज ठाकरेंचा शरद पवारांना नमस्कार....मनसे अध्यक्ष राज ठाकरे `चक्क खाली वाकले`? ऐकून जरा विचित्र वाटतं ना? होय हे खरं आहे... पण खाली वाकले ते म्हणजे कृषीमंत्री शरद पवार यांचा आर्शीवाद घेण्यासाठी. वडिलधारे असे असणारे शरद पवार आणि राज ठाकरे यांची भेट होताच राज ठाकरे यांनी सर्वांसमक्ष खाली वाकून शरद पवार यांना नमस्कार केला. तितक्याच आपलेपणाने शरद पवार यांनीही राज ठाकरेंना आर्शीवादही दिला. निमित्त होतं वनमंत्री पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्र्वजीत आणि उद्योगपती अविनाश भोसले यांनी कन्या स्वप्नाली यांचा शाही विवाहसोहळा. आणि त्या सोहळ्यात अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

राज ठाकरेंचा शरद पवारांना नमस्कार....
मनसे अध्यक्ष राज ठाकरे `चक्क खाली वाकले`? ऐकून जरा विचित्र वाटतं ना? होय हे खरं आहे... पण खाली वाकले ते म्हणजे कृषीमंत्री शरद पवार यांचा आर्शीवाद घेण्यासाठी. वडिलधारे असे असणारे शरद पवार आणि राज ठाकरे यांची भेट होताच राज ठाकरे यांनी सर्वांसमक्ष खाली वाकून शरद पवार यांना नमस्कार केला. तितक्याच आपलेपणाने शरद पवार यांनीही राज ठाकरेंना आर्शीवादही दिला.

निमित्त होतं वनमंत्री पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्र्वजीत आणि उद्योगपती अविनाश भोसले यांनी कन्या स्वप्नाली यांचा शाही विवाहसोहळा. आणि त्या सोहळ्यात अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

2/5

सुप्रिया सुळेंची धावपळ... तीसुद्धा राज ठाकरेंसाठी?`ओ हॅलो.. हॅलो... हॅलो तुमच्या सिक्युरिटीला जरा मागे करून निघाले....` असं म्हणत सुप्रिया सुळे या राज ठाकरेंसाठी धावपळ करत पढे आल्याचे या शाही लग्नात दिसून आलं... आणि त्यांच्या या वक्तव्यावर राज ठाकरे हे देखील चांगलेच दिलखुलास हसताना दिसून आले. पुण्यात रंगलेल्या शाही सोहळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील उपस्थिती लावली होती. राज ठाकरे यांचे आगमन होताच त्यांच्याभोवती नेहमीप्रमाणे गर्दीचं कोडाळं झालं होतं. त्यामुळे प्रत्येकांनी आवर्जुन राज ठाकरे यांची भेट घेत होते. मात्र या लग्नात सर्वात जास्त धावपळ सुरू होती ती म्हणजे शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांची... ठाकरे आणि पवार यांच्यातील मैत्री संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. त्यामुळे राज ठाकरेंना पाहून सुप्रिया सुळे अगदी धावपळत पुढे आल्या आणि जाता जाता का होईना राज ठाकरे यांची ओझरती भेट त्यांनी आवर्जुन घेतली.

सुप्रिया सुळेंची धावपळ... तीसुद्धा राज ठाकरेंसाठी?
`ओ हॅलो.. हॅलो... हॅलो तुमच्या सिक्युरिटीला जरा मागे करून निघाले....` असं म्हणत सुप्रिया सुळे या राज ठाकरेंसाठी धावपळ करत पढे आल्याचे या शाही लग्नात दिसून आलं... आणि त्यांच्या या वक्तव्यावर राज ठाकरे हे देखील चांगलेच दिलखुलास हसताना दिसून आले.

पुण्यात रंगलेल्या शाही सोहळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील उपस्थिती लावली होती. राज ठाकरे यांचे आगमन होताच त्यांच्याभोवती नेहमीप्रमाणे गर्दीचं कोडाळं झालं होतं. त्यामुळे प्रत्येकांनी आवर्जुन राज ठाकरे यांची भेट घेत होते. मात्र या लग्नात सर्वात जास्त धावपळ सुरू होती ती म्हणजे शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांची... ठाकरे आणि पवार यांच्यातील मैत्री संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. त्यामुळे राज ठाकरेंना पाहून सुप्रिया सुळे अगदी धावपळत पुढे आल्या आणि जाता जाता का होईना राज ठाकरे यांची ओझरती भेट त्यांनी आवर्जुन घेतली.

3/5

`दादा उठ की रं....` - सुप्रिया सुळे`मी कुठं जातेयं... इथचं आहे.... माझे फोटो-बिटो झालं काढून... तू कुठे चाललास? थांब इकडं.. फोटो काढू..` असं म्हणत सुप्रिया सुळे, अभिजीत पवार आणि श्रीनिवास पवार फोटो काढण्यासाठी तयार झाले.. मात्र तितक्यात त्यांना त्यांच्या `आवडत्या दादां`ची आठवण झाली.. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शेजारीच बसल्याचे त्यांनी पाहिलं आणि त्यांनी अगदी गोड आवाजात अजितदादांना साद घातली... `दादा उठ की रं....` असं म्हणताच अजितदादाही चटदिशी उठून फोटो काढण्यासाठी सुप्रिया सुळेसोबत उभे राहिले देखील... आणि हाच गोड क्षण कॅमेरात पटकन कैदही झाला. `दादा उठ की रं`..... असं ताई म्हणाल्या आणि आपण अजूनही या मातीशी जोडलेलो आहोत हे पटकन दिसून आलं. विसरत चाललेल्या कुटूंबव्यवस्थेचं, हरवत चाललेल्या नात्यात आणि गढुळ होत चाललेल्या राजकारणाच्या भाऊबंदकीत अजूनही नात्यातला गोडवा टिकून असल्याचं दिसून आलं. सुप्रियाताई अजितदादांना फोटोसाठी गळ घालतात.. आणि एकाचं फोटोत अजित पवार, सुप्रिया सुळे, श्रीनिवसा पवार आणि अभिजीत पवार सगळे एकत्र एकाचवेळी..

`दादा उठ की रं....` - सुप्रिया सुळे
`मी कुठं जातेयं... इथचं आहे.... माझे फोटो-बिटो झालं काढून... तू कुठे चाललास? थांब इकडं.. फोटो काढू..` असं म्हणत सुप्रिया सुळे, अभिजीत पवार आणि श्रीनिवास पवार फोटो काढण्यासाठी तयार झाले.. मात्र तितक्यात त्यांना त्यांच्या `आवडत्या दादां`ची आठवण झाली.. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शेजारीच बसल्याचे त्यांनी पाहिलं आणि त्यांनी अगदी गोड आवाजात अजितदादांना साद घातली... `दादा उठ की रं....` असं म्हणताच अजितदादाही चटदिशी उठून फोटो काढण्यासाठी सुप्रिया सुळेसोबत उभे राहिले देखील... आणि हाच गोड क्षण कॅमेरात पटकन कैदही झाला.


`दादा उठ की रं`..... असं ताई म्हणाल्या आणि आपण अजूनही या मातीशी जोडलेलो आहोत हे पटकन दिसून आलं. विसरत चाललेल्या कुटूंबव्यवस्थेचं, हरवत चाललेल्या नात्यात आणि गढुळ होत चाललेल्या राजकारणाच्या भाऊबंदकीत अजूनही नात्यातला गोडवा टिकून असल्याचं दिसून आलं. सुप्रियाताई अजितदादांना फोटोसाठी गळ घालतात.. आणि एकाचं फोटोत अजित पवार, सुप्रिया सुळे, श्रीनिवसा पवार आणि अभिजीत पवार सगळे एकत्र एकाचवेळी..

4/5

शाही लग्नाला अनेक मान्यवरांची उपस्थितीवनमंत्री पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्र्वजीत आणि उद्योगपती अविनाश भोसले यांनी कन्या स्वप्नाली यांचा शाही विवाहसोहळा. आणि त्या सोहळ्यात अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि त्यांची कन्या प्रणिती शिंदे, शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांनीही या लग्नाला उपस्थिती लावली होती.

शाही लग्नाला अनेक मान्यवरांची उपस्थिती
वनमंत्री पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्र्वजीत आणि उद्योगपती अविनाश भोसले यांनी कन्या स्वप्नाली यांचा शाही विवाहसोहळा. आणि त्या सोहळ्यात अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि त्यांची कन्या प्रणिती शिंदे, शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांनीही या लग्नाला उपस्थिती लावली होती.

5/5

राज ठाकरे सपत्नीकपुण्यात काल शाही विवाह सोहळा रंगला होता. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. वनमंत्री पतंगराव कदम यांचे चिरंजीव आणि उद्योगपती अविनाश भोसले यांनी कन्या यांचा राजेशाही थाटात विवाह झाला.

राज ठाकरे सपत्नीक
पुण्यात काल शाही विवाह सोहळा रंगला होता. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. वनमंत्री पतंगराव कदम यांचे चिरंजीव आणि उद्योगपती अविनाश भोसले यांनी कन्या यांचा राजेशाही थाटात विवाह झाला.