1/11
नाईन अवर्स टू राम (१९६३)
या चित्रपटात महात्मा गांधी यांच्या जीवनावर माहिती असून नऊ तासांपूर्वी गांधीजींच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आहे. हिंसा आणि अशांत जीवनावर हा चित्रपट बेतला आहे. अशांत जीवन कुटुंबातील चेहरे यांच्या जीवनातील भूमिका मांडण्याचा या चित्रपटात प्रयत्न केला गेला आहे. यामध्ये नथुराम गोडसे यांचे पात्रही दाखविले आहे.
2/11
3/11
गांधी (१९८२)
महात्मा गांधी यांच्याजीवनावर हा चित्रपट आहे. गांधींची आठवण यातून दाखविण्याचा प्रयत्न केला केला आहे. या चित्रपटात अहिंसेचा पुरस्कार करण्यात आला आहे. अहिंसेविरोधात गांधीजींचे जीवन आणि संघर्ष दाखविण्यात ला आहे. भारत छोडो आंदोलन, असहयोग अभियान, गांधीचा कारावास, जालियानवाला हत्याकांड याबाबत संघर्ष दाखविण्यात आलाय.
4/11
सरदार (१९९३)
या चित्रपटात स्वतंत्रसेनानी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यांच्या भोवती हा चित्रपट आहे. असे असले तरी पटेल आणि महात्मा गांधी यांनी स्वतंत्र मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न. त्यासाठी पटेल आणि गांधी यांनी दिलेली व्याख्याने दाखविण्यात आली आहेत. यामध्ये गांधीच्या मतांवर खिल्ली उडविण्याचा प्रयत्न दाखविण्यात आला आहे. अन्नू कपून यांने गांधीजींची तर परेश रावल यांनी सरदार पटेल यांची भूमिका साकारली आहे.
5/11
6/11
हे राम (२०००)
हा चित्रपट हिंदूवादी नथुराम गोडसेवर आधरित आहे. भारत देशाचे विभाजन महात्मा गांधीमुळे झाले, अशी समजूत करून त्यांची हत्या नथुराम करतो. गांधी यांची भूमिका नसरूद्दिन शाह याने केली आहे. कमल हसन हा या चित्रपटाचा निर्माता आहे. भारताचे विभाजन आणि महत्मा गांधी यांची हत्या यावर या चित्रपटात लक्ष केंद्रीत केले आहे. राम व्यक्तीरेखेची भूमिका कलम हसनने साकारली आहे. हा चित्रपट चालना नसला तरी त्याला ऑस्करसाठी २०००मध्ये नामांकन दिले गेले.
7/11
लगे रहो मुन्नाभाई (२००६)
राजकुमार हिरानी आणि विधु विनोद चोप्रा यांचा लोकप्रिय नवीन शब्द `गांधीगिरी` देशात गांधीवादीचा दर्शन दाखविणारा हिट ठरला. लगे रहो मुन्नाभाई हि चित्रपट हिट ठरला. गांधीचे विचार या चित्रपटात मांडण्यात आले. जरी विरोध झाला तरी शांतपणे कशी करावी गांधीगिरी यावर भर देण्यात आला. गांधीची भूमिका अनुभवी अभिनेता दिलीप प्रभावळकर यांनी साकारली आणि ती जीवंत केली. यामध्ये मुन्नाभाई संजय दत्त हा एक अंडरवर्ल्ड डॉन महात्मा गांधी यांची भावना समजावून काम करीत असतो. भारतीय समाजावर कसा गांधींच्या विचारांचा पगडा आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
8/11
गांधी, मेरे पिता (२००७)
अभिनेता अनिल कपूरनेह महात्मा गांधी यांच्यावर चित्रपट काढला. २००७मध्ये महात्मा गांधी (दर्शन जरीवाला) आणि त्यांचा मुलगा (अक्षय खन्ना) यांच्यामधील दुरावलेल्या संबंधाबात या चित्रपटात लक्ष केंद्रीत केले गेले आहे. यांच्या दोघांमधील दुरावलेली दरी आणि वैचारिक मतभेत यांच्यातील संघर्ष दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
9/11
मैने गांधी को नहीं मारा (२००५)
या चित्रपटात अनुभवी अभनेता अनुपम खेर यांनी एका निवृत्त प्राध्यापकाची भूमिका साकारली आहे. ते हिंदी प्राध्यापक आहेत. त्याच्या जीवनात विचित्रि स्थिती निर्माण झाल्याने ते वेडे दाखविले गेले आहेत. त्यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येचा आरोप केला. यामध्ये उर्मिला मातोंडकर हिने हिरोईनची भूमिका साकारली आहे.
10/11
महात्मा (२००९)
२००९मध्ये तेलगू भाषेत महात्मा गांधींवर चित्रपट काढण्याचे ठरले. यासाठी १२ कोटींचे बजेट होते. ‘महात्मा’ यांची भूमिका साकारण्यासाठी श्रीकांत यांचे नाव सुचविले गेले. हा चित्रपट कृष्ण वामसी यांनी निर्देशीत केला. गांधीवाद याच दाखविण्यात आला. यामध्ये एका उपद्रवी माणसाला बदलण्याचा प्रवास चित्रित करण्यात आला आहे.
11/11