वयाच्या अगोदर नका होऊ म्हातारे!

Jun 23, 2013, 16:45 PM IST
1/7

रात्री उशीरापर्यंत जागरण केल्यासरात्री उशीरापर्यंत काम केल्याने, रात्रभर जागरण केल्याने त्याचा परिणाम फक्त तुमच्या रोजच्या जगण्यावर न होता तुमच्या शरीरावरही होतो. यामुळे ताण तर वाढतोच त्याचबरोबर चेहऱ्यावर सुरकुत्याही येतात.

रात्री उशीरापर्यंत जागरण केल्यास

रात्री उशीरापर्यंत काम केल्याने, रात्रभर जागरण केल्याने त्याचा परिणाम फक्त तुमच्या रोजच्या जगण्यावर न होता तुमच्या शरीरावरही होतो. यामुळे ताण तर वाढतोच त्याचबरोबर चेहऱ्यावर सुरकुत्याही येतात.

2/7

मनात एखाद्याबद्दल वाईट विचार...एखादी गोष्ट जाहिरपणे न बोलता ती मनातल्या मनात साठवून ठेवण आणि वेळ आल्यावर तिचा बदला घेण्याच्या दृष्टीने तिचा विचार करण याचा परिणामही चेहऱ्यावर होतो. जर्नल ऑफ बिहेवियरल मेडिसिनच्या शोधांतर्गत एखादी गोष्ट किंवा एखाद्याबद्दलचा राग मनातल्या मनात साठवून ठेवल्यास शरीरातील कोर्टिजोल हार्मोन्सचा स्तर कमी होतो आणि त्याचा परिणाम चेहऱ्यावर होतो.

मनात एखाद्याबद्दल वाईट विचार...

एखादी गोष्ट जाहिरपणे न बोलता ती मनातल्या मनात साठवून ठेवण आणि वेळ आल्यावर तिचा बदला घेण्याच्या दृष्टीने तिचा विचार करण याचा परिणामही चेहऱ्यावर होतो. जर्नल ऑफ बिहेवियरल मेडिसिनच्या शोधांतर्गत एखादी गोष्ट किंवा एखाद्याबद्दलचा राग मनातल्या मनात साठवून ठेवल्यास शरीरातील कोर्टिजोल हार्मोन्सचा स्तर कमी होतो आणि त्याचा परिणाम चेहऱ्यावर होतो.

3/7

मोठ्या प्रमाणात डोळे चोळल्यानंतरथकवा आल्यानंतर किंवा रोजच्या सवयीमुळे तुम्ही दिवसभरातून कित्येकदा जर डोळे चोळत असाल तर यामुळे सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ शकतात. डोळे अधिक प्रमाणात चोळल्यामुळे डोळ्याच्या आसपासचे प्रथिन घटक नष्ट होऊन सुरकुत्या पडतात.

मोठ्या प्रमाणात डोळे चोळल्यानंतर

थकवा आल्यानंतर किंवा रोजच्या सवयीमुळे तुम्ही दिवसभरातून कित्येकदा जर डोळे चोळत असाल तर यामुळे सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ शकतात. डोळे अधिक प्रमाणात चोळल्यामुळे डोळ्याच्या आसपासचे प्रथिन घटक नष्ट होऊन सुरकुत्या पडतात.

4/7

सिगरेट जास्त ओढत असाल तर...अमेरिकन जर्नल ऑफ पब्लिक हेल्थनुसार अधिक प्रमाणात धुम्रपान करणाऱ्या लोकांचे आयुष्य आठ वर्षाने कमी होते. तसेच, अधिक धुम्रपानामुळे कँसर, हृदयरोग तसेच सुरकुत्या, पांढरे केसांची समस्या बळावतात.

सिगरेट जास्त ओढत असाल तर...

अमेरिकन जर्नल ऑफ पब्लिक हेल्थनुसार अधिक प्रमाणात धुम्रपान करणाऱ्या लोकांचे आयुष्य आठ वर्षाने कमी होते. तसेच, अधिक धुम्रपानामुळे कँसर, हृदयरोग तसेच सुरकुत्या, पांढरे केसांची समस्या बळावतात.

5/7

उशीवर तोंड ठेऊन झोपणंजे लोक जास्त करुन उपडी म्हणजेच पोटावर झोपतात आणि चेहरा उशिवर ठेवतात त्यांच्या चेहऱ्यावर वेळेच्या आधीच सुरकुत्या पडतात. यामुळे त्वचेवरचा तणाव वाढतो आणि वेळेच्या आधिच सुरकुत्या पडतात.

उशीवर तोंड ठेऊन झोपणं

जे लोक जास्त करुन उपडी म्हणजेच पोटावर झोपतात आणि चेहरा उशिवर ठेवतात त्यांच्या चेहऱ्यावर वेळेच्या आधीच सुरकुत्या पडतात. यामुळे त्वचेवरचा तणाव वाढतो आणि वेळेच्या आधिच सुरकुत्या पडतात.

6/7

प्रमाणाबाहेर दारुचे सेवनक्लिनीकल अॅन्ड एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनांतर्गत जे लोक प्रमाणाबाहेर दारु पितात त्यांची आर्युमर्यादाच केवळ कमी होत नाही, तर त्यांना ब्लड प्रेशर तसेच लिव्हरलाही समस्या निर्माण होतात.

प्रमाणाबाहेर दारुचे सेवन

क्लिनीकल अॅन्ड एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनांतर्गत जे लोक प्रमाणाबाहेर दारु पितात त्यांची आर्युमर्यादाच केवळ कमी होत नाही, तर त्यांना ब्लड प्रेशर तसेच लिव्हरलाही समस्या निर्माण होतात.

7/7

तुम्हालाही आहेत वाईट सवयी?अनेक जण कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या येणं, केस पिकणं अशा अनेक समस्यांना सामोरे जाताना दिसतात. त्यातही कुणीतरी आपल्याला ‘काका-काकू’ म्हणून हाक मारणं हे अगदी अपमानास्पदच वाटतं. जर तुम्हीसुद्धा याच पायरीवर असाल तर थांबा आणि विचार करा, कदाचित तुमच्याच काही सवयींमुळे तुमच्या चेहऱ्यावर म्हातारपणाची लक्षणं दिसून येत असतील. विचारपूर्वक लक्ष द्या आणि पहा कदाचित यातल्याच काही सवयी असतील ज्या तुमच्या शरीरावर वाढत्या वयाच्या परिणाम अधिक घडवून आणत आहेत का?

तुम्हालाही आहेत वाईट सवयी?

अनेक जण कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या येणं, केस पिकणं अशा अनेक समस्यांना सामोरे जाताना दिसतात. त्यातही कुणीतरी आपल्याला ‘काका-काकू’ म्हणून हाक मारणं हे अगदी अपमानास्पदच वाटतं. जर तुम्हीसुद्धा याच पायरीवर असाल तर थांबा आणि विचार करा, कदाचित तुमच्याच काही सवयींमुळे तुमच्या चेहऱ्यावर म्हातारपणाची लक्षणं दिसून येत असतील.

विचारपूर्वक लक्ष द्या आणि पहा कदाचित यातल्याच काही सवयी असतील ज्या तुमच्या शरीरावर वाढत्या वयाच्या परिणाम अधिक घडवून आणत आहेत का?