बॉलिवूडच्या अशाही जोड्या...

Jul 19, 2014, 18:05 PM IST
1/9

अमृता सिंह आणि सैफ अली खान : 

सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचा आता घटस्फोट झाला असला तरी या दोघांच्या लग्नांनं अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या... कारण, सैफ अली खान अमृताहून 10 वर्षांनी लहान आहे.

अमृता सिंह आणि सैफ अली खान : सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचा आता घटस्फोट झाला असला तरी या दोघांच्या लग्नांनं अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या... कारण, सैफ अली खान अमृताहून 10 वर्षांनी लहान आहे.

2/9

जरीना वहाब आणि आदित्य पंचोली :

अभिनेता आदित्य पंचोली त्याच्या पत्नीपेक्षा – जरीना वहाबपेक्षा सात वर्षांनी लहान आहे. पण, या दोघांनीही एकमेकांना पूरेपूर आधार दिलाय.

जरीना वहाब आणि आदित्य पंचोली : अभिनेता आदित्य पंचोली त्याच्या पत्नीपेक्षा – जरीना वहाबपेक्षा सात वर्षांनी लहान आहे. पण, या दोघांनीही एकमेकांना पूरेपूर आधार दिलाय.

3/9

अर्चना पूरण सिंह आणि परमीत  : 

अभिनेत्री आणि ‘कॉमेडी सर्कस’ची जज म्हणून सगळ्यांसमोर खो-खो हसणारी अर्चना पूरण सिंह तिचा पती परमीत हून सात वर्षांनी मोठी आहे.

अर्चना पूरण सिंह आणि परमीत : अभिनेत्री आणि ‘कॉमेडी सर्कस’ची जज म्हणून सगळ्यांसमोर खो-खो हसणारी अर्चना पूरण सिंह तिचा पती परमीत हून सात वर्षांनी मोठी आहे.

4/9

फराह खान आणि शिरीष कुंदर : 

अत्यंत कमी वेळात अभिनेत्री, कोरिओग्राफर आणि सिनेमा दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये आपला दबदबा निर्माण करणारी फराह खान तिचा पती शिरीष कुंदरहून तब्बल आठ वर्षांनी मोठी आहे.

फराह खान आणि शिरीष कुंदर : अत्यंत कमी वेळात अभिनेत्री, कोरिओग्राफर आणि सिनेमा दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये आपला दबदबा निर्माण करणारी फराह खान तिचा पती शिरीष कुंदरहून तब्बल आठ वर्षांनी मोठी आहे.

5/9

मेहर जेसिया आणि अर्जुन रामपाल : 

अभिनेता अर्जुन रामपाल त्याची पत्नी आणि माजी सुपर मॉडेल मेहर जेसियापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे. पण, बॉलिवूडच्या कोणत्याही कार्यक्रमात ही जोडी जेव्हा एकत्र दिसते तेव्हा आपसूकच अनेक नजरा त्यांच्याकडे वळतात.

मेहर जेसिया आणि अर्जुन रामपाल : अभिनेता अर्जुन रामपाल त्याची पत्नी आणि माजी सुपर मॉडेल मेहर जेसियापेक्षा दोन वर्षांनी लहान आहे. पण, बॉलिवूडच्या कोणत्याही कार्यक्रमात ही जोडी जेव्हा एकत्र दिसते तेव्हा आपसूकच अनेक नजरा त्यांच्याकडे वळतात.

6/9

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा : 

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या वयांमध्ये काही फार अंतर नाही. शिल्पा राजहून केवळ तीन महिन्यांनी मोठी आहे. पण, तरीही हे जोडपं एक आदर्श जोडपं म्हणून ओळखलं जातं. आयुष्यातील चढ-उतारात ही दोघं एकमेकांना हसत हसत साथ देताना दिसतात... मग, ते आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरण असो किंवा त्यांच्या चिमुकल्या बाळाचा जन्म.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या वयांमध्ये काही फार अंतर नाही. शिल्पा राजहून केवळ तीन महिन्यांनी मोठी आहे. पण, तरीही हे जोडपं एक आदर्श जोडपं म्हणून ओळखलं जातं. आयुष्यातील चढ-उतारात ही दोघं एकमेकांना हसत हसत साथ देताना दिसतात... मग, ते आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरण असो किंवा त्यांच्या चिमुकल्या बाळाचा जन्म.

7/9

अधुना अख्तर आणि फरहान अख्तर : 

फरहान त्याची पत्नी अधुना हिच्याहून सहा वर्षांनी छोटा आहे. ‘दिल चाहता है’ हा सिनेमा बनविताना अधुना आणि फरहानची पहिली भेट झाली होती. त्यानंतर 2000 साली या दोघांनी आपल्या नात्याला नवं नाव देऊन विवाह बंधनात अडकणं पसंत केलं.

अधुना अख्तर आणि फरहान अख्तर : फरहान त्याची पत्नी अधुना हिच्याहून सहा वर्षांनी छोटा आहे. ‘दिल चाहता है’ हा सिनेमा बनविताना अधुना आणि फरहानची पहिली भेट झाली होती. त्यानंतर 2000 साली या दोघांनी आपल्या नात्याला नवं नाव देऊन विवाह बंधनात अडकणं पसंत केलं.

8/9

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन : 

यामध्ये, सगळ्यात पहिला क्रमांक आहे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिचा पती अभिषेक बच्चन या जोडीचं... बॉलिवूडची सुंदरी ऐश्वर्या राय बच्चन ही तिचा पती अभिषेक बच्चनहून दोन वर्षांनी मोठी आहे. परंतु, तरीही या दोघांची केमिस्ट्री सगळ्यांमध्ये कुतुहलाचा आणि उत्सुकतेचा विषय ठरलेला आहे

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन : यामध्ये, सगळ्यात पहिला क्रमांक आहे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिचा पती अभिषेक बच्चन या जोडीचं... बॉलिवूडची सुंदरी ऐश्वर्या राय बच्चन ही तिचा पती अभिषेक बच्चनहून दोन वर्षांनी मोठी आहे. परंतु, तरीही या दोघांची केमिस्ट्री सगळ्यांमध्ये कुतुहलाचा आणि उत्सुकतेचा विषय ठरलेला आहे

9/9

पत्नी पतीपेक्षा वयानं मोठी असणं, हा काही आता नवा ट्रेंड राहिलेला नाही. तरीही सामाजिक स्तरावर पत्नी पतीपेक्षा 4-5 वर्षांनी छोटी असायला हवी, असं मानणारेही अनेक जण दिसतात. 

पण, बॉलिवूडमध्ये खऱ्याखुऱ्या जीवनात काही अशाही जोड्या दिसून येतात ज्यामध्ये पत्नी पतीपेक्षा वयानं मोठ्या आहेत. पती-पत्नीमध्ये वयाचं हे अंतर असणं बॉलिवूडला आता काही नवीन नाही. तरीसुद्धा या जोड्या लोकांमध्ये आदर्श जोड्या म्हणून ओळखल्या जातात.

बॉलिवूडच्या या जोड्यांनी सामाजिक विचारांच्या या सीमा धूसर ठरवून सफल विवाहाचे नवी उदाहरणं लोकांसमोर ठेवलेल्या आहेत.

पत्नी पतीपेक्षा वयानं मोठी असणं, हा काही आता नवा ट्रेंड राहिलेला नाही. तरीही सामाजिक स्तरावर पत्नी पतीपेक्षा 4-5 वर्षांनी छोटी असायला हवी, असं मानणारेही अनेक जण दिसतात. पण, बॉलिवूडमध्ये खऱ्याखुऱ्या जीवनात काही अशाही जोड्या दिसून येतात ज्यामध्ये पत्नी पतीपेक्षा वयानं मोठ्या आहेत. पती-पत्नीमध्ये वयाचं हे अंतर असणं बॉलिवूडला आता काही नवीन नाही. तरीसुद्धा या जोड्या लोकांमध्ये आदर्श जोड्या म्हणून ओळखल्या जातात. बॉलिवूडच्या या जोड्यांनी सामाजिक विचारांच्या या सीमा धूसर ठरवून सफल विवाहाचे नवी उदाहरणं लोकांसमोर ठेवलेल्या आहेत.