Laxmi Puja: 1 जुलै 2022 रोजी खास योग, देवी लक्ष्मीची पूजा करुन मिळवा कृपा

देवी लक्ष्मीची आपल्या सदा कृपा राहावी यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील असतो. 

Updated: Jun 30, 2022, 04:28 PM IST
Laxmi Puja: 1 जुलै 2022 रोजी खास योग, देवी लक्ष्मीची पूजा करुन मिळवा कृपा title=

Pushya Nakshtra Lakshmi Puja: देवी लक्ष्मीची आपल्या सदा कृपा राहावी यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील असतो. यासाठी देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा करतात. देवी लक्ष्मीची ज्या व्यक्तीवर कृपा असते त्या व्यक्तीला पैशांची कमतरता नसते. अशा स्थितीत जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल, तर उद्याचा म्हणजेच 1 जुलैचा दिवस त्यासाठी खूप खास आहे.

शुक्रवार, 1 जुलै रोजी अनेक विशेष योग आहेत. या शुभ योगांमध्ये लक्ष्मीची पूजा करणे खूप फायदेशीर आहे. देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन त्या व्यक्तीला सुख, समृद्धी आणि संपत्तीचे आशीर्वाद देते. कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी देवी लक्ष्मीची कृपा खूप महत्त्वाची असते. चला जाणून घेऊयात

शुभ योग 

शुभ दिनी शुभ योग असणं क्वचितच होतं. पंचागानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची दुसरी तिथी शुक्रवार, 1 जुलै रोजी येत आहे. या दिवशी पुष्य नक्षत्र तयार होत आहे. या नक्षत्रावर देवी लक्ष्मीची पूजा विशेष फलदायी ठरते. शुक्रवार देखील देवी लक्ष्मीला समर्पित आहे. 

देवी लक्ष्मी पूजन

  • सकाळ संध्याकाळ देवी लक्ष्मीची पूजा करा.
  • या दिवशी देवी लक्ष्मीची कृपा मिळविण्यासाठी घराच्या मुख्य दारावर तुपाचा दिवा लावा.
  • गरीब मुलीच्या लग्नात सहयोग करा.
  • शुक्रवारी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी महिलांना सौभाग्याच्या वस्तू द्या.
  • या दिवशी पांढरे वस्त्र आणि वस्तूंचे दान विशेष फलदायी असते.
  • देवी लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करा

- ॐ ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नम

- ॐ श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्।

-ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद ॐ श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्ये नम:   

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. याला ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)