SRH vs GT : हैदराबादने फोडला प्लेऑफचा नारळ, दिल्लीचा 'पत्ता कट'; आरसीबी अन् चेन्नईची धाकधूक वाढली

SRH qualified for the IPL Playoffs : सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झालाय. त्यामुळे आता हैदराबादने प्लेऑफचा नारळ फोडला आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघ प्लेऑफच्या रेसमधून बाहेर पडला आहे. 

सौरभ तळेकर | Updated: May 16, 2024, 10:43 PM IST
SRH vs GT : हैदराबादने फोडला प्लेऑफचा नारळ, दिल्लीचा 'पत्ता कट'; आरसीबी अन् चेन्नईची धाकधूक वाढली title=
SRH qualified for the IPL Playoffs

Sunrisers Hyderabad In IPL 2024 playoffs : आयपीएलचा 66 वा सामना पावसामुळं रद्द करण्यात आला आहे. हैदराबादमध्ये सनरायझर्स संघ गुजरातचा सामना करणार होता. मात्र, टॉसपूर्वीच पाऊस सुरू झाल्यानं सामन्यात एकही बॉल खेळवता आला नाही. पाच षटकांच्या सामन्यासाठी 10:30 चा कट ऑफ टाइम होता. मात्र, पावसाची संततधार सुरूच राहिल्याने अखेर पंचांनी मैदानावरील कर्मचाऱ्यांशी बोलून सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे सनरायझर्स हैदराबादचा संघ थेट प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. हा सामना रद्द झाल्यामुळे हैदराबाद आणि गुजरात या दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. त्यामुळे आता पाईंट्स टेबल अधिकच रंजक झाल्याचं पहायला मिळतंय.

पावसामुळे सामना रद्द झाल्याने आता चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची चिंता वाढली आहे. सध्या आरसीबी अधिक चिंतेत असेल कारण 13 सामन्यांनंतर त्याचे केवळ 12 गुण आहेत. जर आरसीबीला प्लेऑफसाठी पात्र ठरायचं असेल तर 18 मे रोजी होणाऱ्या सामन्यात सीएसकेला पराभूत करावे लागेल. चेन्नई आणि आरसीबी यांच्यात 18 मे रोजी आयपीएलमधील सर्वात मोठा म्हणजेत नॉक आऊट सामना होणार आहे. या जिंकेल तो संघ प्लेऑफमध्ये जाईल. मात्र, बंगळुरूला मोठा विजय मिळवावा लागेल. 

बंगळुरूच्या विजयाचं समीकरण कसं असेल?

बंगळुरूला दर प्लेऑफ गाठायची असेल तर चेन्नईचा 18 धावांनी पराभव करावा लागेल. (जर चेन्नईने 200 धावा केल्या असं गृहित धरलं तर) त्याचबरोबर जर आरसीबीला प्रथम गोलंदाजी करावी लागली तर आरसीबीला टार्गेट 18.1 ओव्हरमध्ये पूर्ण करावं लागेल. 

गुजरात टायटन्सची टीम : शुबमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, ऋद्धिमान साहा, साई सुधारसन, शाहरुख खान, मॅथ्यू वेड, केन विल्यमसन, अजमतुल्ला ओमरझाई, अभिनव मनोहर, रशीद खान, विजय शंकर, राहुल तेवतिया, स्पेन्सर जॉन्सन, कार्तिक त्यागी, जोशुआ लिटल, दर्शन नळकांडे, नूर अहमद, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहित शर्मा, जयंत यादव, उमेश यादव, सुशांत मिश्रा, संदीप वॉरियर, शरथ बीआर आणि मानव सुथर.

सनरायजर्स हैदराबाद टीम : पॅट कमिन्स (कॅप्टन), जयदेव उनाडकट, झटावेध सुब्रमण्यन, टी नटराजन, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, ग्लेन फिलिप्स, नितीश रेड्डी, मार्को जॅनसेन, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, उपेंद्र यादव, एडन मारक्रम, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, अनमोलप्रीत सिंग, मयंक अग्रवाल, अब्दुल समद, आकाश महाराज सिंग, वानिंदू हसरंगा आणि उमरान मलिक.