Maha sanyog In Karwa Chauth 2023: हिंदू धर्मात करवा चौथला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत ठेवतात. त्यामुळे हा दिवस विवाहित महिलांसाठी खास असतो. दरम्यान ज्योतिष्य शास्त्रानुसार, या दिवशी एक अतिशय शुभ संयोग तयार होत आहे. यंदाच्या वर्षी करवा चौथ 1 नोव्हेंबर 2023 रोजी साजरा केला जाणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या वर्षी करवा चौथला मोठा संयोग होणार आहे.
1 नोव्हेंबर रोजी दिवशी मंगळ आणि बुध आणि सूर्य तूळ राशीत येणार आहे. यासोबतच सूर्य आणि बुधाच्या संयोगाने बुधादित्य योग तयार होतोय, तर दुसरीकडे मंगळ आणि सूर्य मिळून मंगल आदित्य योग तयार कऱणार आहेत. यासोबतच या दिवशी शिवयोग आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होणार आहेत. शनिमुळे शश राजयोग तयार होत असल्याने या दिवशी अनेत शुभ योग तयार होतायत. तब्बल 100 वर्षांनी हे असं घडणार असून या अनेक योगांमुळे काही राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी करवा चौथचा दिवस खूप फायदेशीर ठरू शकणार आहे. या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभासोबत सुख-समृद्धी मिळणार आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होणार आहेत. रखडलेल्या योजना पुन्हा सुरू होऊ शकतात. व्यवसायात आर्थिक लाभ मिळू शकतो. नवीन नोकरीच्या शोधात असलेले लोक यश मिळवू शकतात. संपत्तीत वाढ झाल्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरदार लोकांनाही लाभ मिळू शकतो.
कन्या राशीच्या लोकांना ग्रहांच्या या गोचरमुळे विशेष लाभ मिळू शकतो. करवा चौथच्या दिवशी या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. या काळात व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर अशा वेळी असे करणे फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला चांगली नोकरीची ऑफर मिळू शकते.
मकर राशीच्या लोकांनाही या महासंयोगाचा लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. जीवनात संपत्ती मिळण्याची आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची पूर्ण शक्यता आहे. नोकरीमध्ये पगार वाढण्याची आणि नवीन नोकरीच्या संधी मिळण्याची संधी मिळेल. मेहनतीमुळे उत्पन्न वाढण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायात भरपूर फायदा होऊ शकतो. वैवाहिक जीवनात आनंद येणार आहे.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )