Mercury Transit: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये बुध आणि गुरूच्या गोचरला धार्मिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे. गुरू आणि बुध यांचा संयोग लाभदायक मानला जातो. बुध आणि गुरु यांच्या संयोगाने नवपंचम योग निर्माण होतो.
यावेळी सुमारे 500 वर्षांनंतर हा योग तयार होत असल्याचं मानलं जातं. नवपंचम योग तयार झाल्याने काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. 8 एप्रिलपर्यंत बुध मेष राशीत राहील. जोपर्यंत बुध मेष राशीत राहील तोपर्यंत नवपंचम राजयोग राहणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींसाठी हा राजयोग लाभदायक ठरणार आहे.
धनु रास
धनु राशीच्या लोकांसाठी गुरु आणि बुध यांचा संयोग शुभ मानला जातो. बुध आणि गुरूच्या शुभ प्रभावामुळे तुमची सर्व प्रलंबित कामे सुरू होतील. कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो. तुम्हाला सुख आणि संपत्तीचा लाभ मिळेल. याशिवाय घरामध्ये शुभ कार्य होण्याची शक्यता आहे.
सिंह रास
सिंह राशीच्या लोकांसाठी गुरु आणि बुध यांचे संयोग फायदेशीर ठरू शकतात. नोकरी करणारे लोक कौतुकास पात्र होतील. व्यावसायिकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. लव्ह लाईफच्या बाबतीत तुम्हाला फायदा होऊ शकतो. रखडलेली कामे पूर्ण होतील. तुमचे काम व्यवसाय, परदेशी, इलेक्ट्रॉनिक उद्योग असेल तर तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळू शकतो.
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांसाठी गुरू आणि बुध यांचा संयोग लाभदायक मानला जातो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमचे मित्र आणि बॉस यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्हाला आर्थिक अडचणींपासून दिलासा मिळेल. व्यवसायात निर्माण होणारी कोणतीही समस्या आपोआप सुटणार आहे. या कालावधीत तुमची गुंतवणूक नफा देईल.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)