Angaraki Chaturthi 2023: अंगारकी चतुर्थीला 27 वर्षानंतर सर्वार्थ सिद्धी योग, जाणून घ्या पूजाविधी आणि महत्त्व

Angaraki Chaturthi 2023: वर्षभरात एकूण 24 चतुर्थी येतात. शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायकी, तर कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी संबोधलं जातं. हा दिवस गणपती बाप्पाला समर्पित आहे. वर्षभरातील जितक्या चतुर्थी येतात. त्यातील मंगळवारी येणारी चतुर्थी म्हणजेच अंगारकी चतुर्थी सर्वात खास असते.

Updated: Jan 9, 2023, 02:57 PM IST
Angaraki Chaturthi 2023: अंगारकी चतुर्थीला 27 वर्षानंतर सर्वार्थ सिद्धी योग, जाणून घ्या पूजाविधी आणि महत्त्व title=

Angaraki Chaturthi 2023: वर्षभरात एकूण 24 चतुर्थी येतात. शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायकी, तर कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी संबोधलं जातं. हा दिवस गणपती बाप्पाला समर्पित आहे. वर्षभरातील जितक्या चतुर्थी येतात. त्यातील मंगळवारी येणारी चतुर्थी म्हणजेच अंगारकी चतुर्थी सर्वात खास असते.  नववर्ष 2023 आणि पौष महिन्यातल्या कृष्ण पक्षातील चतुर्थी मंगळवारी आली आहे. ही चतुर्थी मंगळवारी आल्याने अंगारकी चतुर्थी आहे.  विशेष म्हणजे अंगारकी चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी योग आला आहे. अश्लेषा नक्षत्र असल्याने 27 वर्षानंतर हा योग जुळून आला आहे. या दिवशी व्रत आणि पूजाविधी केल्यास इच्छित फळ प्राप्ती होते. 

शुभ मुहूर्त 

हिंदू पंचांगानुसार अंगारकी चतुर्थी 10 जानेवारीला दुपारी 12 वाजून 9 मिनिटांनी सुरु होईल. तसेच 11 जानेवारीला दुपारी 2 वाजून 31 मिनिटांनी संपेल. उदयतिथीनुसार अंगारकी व्रत 10 जानेवारीला केलं जाईल. हे व्रत चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर संपतं. 10 जानेवारीला चंद्रोदय रात्री 8 वाजून 41 मिनिटांनी आहे.

संकष्टी चतुर्थी व्रत पूजाविधी

सूर्योदयपूर्वी उठून स्नान करा. दिवसभर शक्य तितक्या वेळा गणपती मंत्राचा जप करावा. संध्याकाळी चंद्रोदयानंतर पूजा करावी. जर ढगाळ वातारणामुळे चंद्र दर्शन झालं नाही तर पंचांगानुसार पूजा करा. गणपतीच्या मूर्तीला धुप, दीप, अगरबत्ती दाखवा. तसेच फुलांचा मान द्या. गणपतीला आवडत्या मोदकांचा प्रसाद दाखवा. चंद्रदेवाला अर्घ्य द्या. चंद्राच्या दिशेने फुलं आणि अक्षता अर्पण करा. या दिवशी उपवास ठेवून संध्याकाळी पूजा केल्यानंतर भोजन ग्रहण करावे.उपाशी पोटी राहणं जमत नसेल तर साबुदाणा, उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. या दिवशी काही खास उपाय केल्याने कर्जातून मुक्ती मिळते. तसेच आर्थिक अडचण दूर होऊन भरभराट होते.

बातमी वाचा- Budh Gochar 2023: बुध गोचरामुळे तयार होणार त्रिकोण राजयोग, या तीन राशींना मिळणार लाभ

हे उपाय करा

  • अनेकदा मेहनत करूनही हाती काही लागत नाही. या दिवशी व्रत केल्यास ही अडचण दूर होऊ शकते. या दिवशी 'श्री गणेशाय नम:' या मंत्राचा 108 वेळा जप करावा.
  • व्यवसायात लाभ मिळावा यासाठी गणपतीला 11 दुर्वांची जोडी अर्पण करावी. यामुळे व्यवसायाची भरभराट होते. तसेच कर्ज घेण्याची वेळ येत नाही.
  • गणपतीला मोदक किंवा बुंदीच्या लाडूचा भोग लावल्यास आर्थिक समस्या दूर होते. हा उपाय संकष्टी चतुर्थी बुधवारी आल्यासही करू शकता. यामुळे आर्थिक चणचण भासत नाही.
  • कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी गणपती मंदिरात जाऊन भक्तिभावाने पूजा करावी. ओम गं गणपतेय नम: या मंत्राचा जप करा. यामुळे निश्चित लाभ मिळेल.
  • घरात सुख समृद्धी यावी यासाठी भगवान गणेशाचं जलाभिषेक करावा. तसेच अभिषेकातील पाणी संपूर्ण घरात शिंपडावे. यामुळे घरातील भांडणं सौम्य होतात.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)