Ashadhi Ekadashi 2024 : भेटी लागी जीवा..! कधी आहे आषाढी एकादशी? तिथी, शुभ मुहूर्त, आणि महत्त्व जाणून घ्या

Ashadhi Ekadashi 2024 : आषाढ महिन्याला सुरुवात झाली की भक्तांना वेध लागतात ते विठुरायचा दर्शनाचे...यंदा आषाढी एकादशी, देवशयनी किंवा हरिशयनी एकादशी कधी आहे, शुभ मुहूर्त, महत्त्व आणि कथा याबद्दल संपूर्ण माहिती एका क्लिकवर. 

नेहा चौधरी | Updated: Jun 24, 2024, 09:30 AM IST
Ashadhi Ekadashi 2024 : भेटी लागी जीवा..! कधी आहे आषाढी एकादशी? तिथी, शुभ मुहूर्त, आणि महत्त्व जाणून घ्या title=
Ashadhi Wari 2024 ashadhi ekadashi or devshayani ekadashi 2024 date time shubh muhurat puja vidhi and importance in marathi

Ashadhi Ekadashi 2024 : हिंदू धर्मात व्रत आणि सणांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी म्हणजे वर्षाला 24 एकादशी येत असते. अधिकचा महिना असल्यात 26 एकादशी येतात. प्रत्येक एकादशीला विशेष महत्त्व आहे. पण आषाढ महिन्यातील एकादशीला अन्यन साधारण महत्त्व आहे. जुलै महिन्यात 2 जुलैला योगिनी एकादशीचं व्रत पाळलं जाणार आहे. (Ashadhi Wari 2024 ashadhi ekadashi or devshayani ekadashi 2024 date time shubh muhurat puja vidhi and importance in marathi)

तर आषाढ महिना म्हटलं की, महाराष्ट्रातील भक्तांना खास करुन वारकऱ्यांना वेध लागतात ते आषाढी वारीचे आणि आषाढी एकादशीचं. 
देव माझा विठू सावळा 
माळ त्याची माझिया गळा...

विठू राहे पंढरपुरी, वैकुंठच हे भूवरी, 
भीमेच्या काठी डुले भक्तीचा माळ
साजिरे रूप सुंदर, कटी झळके पितांबर
कंठात तुळशीची हार, कस्तुरी टिळा 

भजनात विठू डोलतो, कीर्तनी विठू नाचतो
रांगुनी जाई पाहुनी, भक्तीचा लळा...

आषाढी एकादशी (Devshayani Ekadashi 2024) तिथी  

हिंदू पंचांगानुसार आषाढी शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 16 जुलैला रात्री 8.33 वाजता सुरु होणार असून 17 जुलै रात्री 9.33 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार आषाढी एकादशी ही 17 जुलैला साजरी करण्यात येणार आहे. (Ashadhi Wari 2024)

देवशयनी एकादशीचे महत्त्व (Importance of Devashyani Ekadashi)

धर्मशास्त्रानुसार आषाढी एकादशीनंतर पुढील चार महिने कोणतेही शुभ कार्यास मनाई असते. घरात प्रवेश, दागिने, वाहन इत्यादी खरेदी करायची नसते. देवूठाणी एकादशीला भगवान विष्णू योगनिद्रातून जागे होतात त्यानंतर शुभ कार्याला आरंभ होतो. 

हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की, मनुष्याचा एक वर्ष ही देवांची एक अहोरात्र असते. तर दक्षिणायन ही देवाची रात्र तर उत्तरायण हा देवाचा दिवस असतो. कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायनला सुरुवात होते... म्हणजेच देव झोपी जातात असं म्हणतात. म्हणून या एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हणतात.

 आषाढी एकादशी शुभ योग ! (Devshayani Ekadashi 2024 Shubh Yog)

देवशयनी एकादशीला अनुराधा नक्षत्रासह सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, शुभ योग आणि शुक्ल योग असणार आहे. सकाळी 7.04 पर्यंत शुभ योग आणि त्यानंतर शुक्ल योग असणार आहे. 

आषाढी एकादशीची पूजाविधी

आषाढी एकादशीला ब्रह्ममुहूर्तावर उठून आंघोळ करुन विष्णू आणि विठुरायाला तुळस अर्पण करावी. त्यानंतर व्रताचं संकल्प करावा. एकादशीला संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरण करावं. पंढरपूरमध्ये यादिवशी असणारे वारकरी विठ्ठलाची आरती करुन विठुरायाचा भक्तीत दंग असतात. असं म्हणतात या दिवशी म्हणजे दशमीच्या अहोरात्र तुपाचा दिवा लावणे शुभ मानले जाते. 

आषाढी एकादशीची कथा

धर्मशास्त्रात आषाढी एकादशीची कथा सांगण्यात आली आहे. सत्ययुगात मांधाता नावाचा चक्रवर्ती सम्राट राजाच्या राज्यात प्रजा आनंदी आणि सुखात नांदायची. पण एकदा त्याच्या राज्यात सलग तीन वर्षे वरुण राजाने दर्शन दिलं नाही. राज्यावर आणि प्रजेवरील संकट पाहून राजा अस्वस्थ झाला.  यावर उपाय शोधण्यासाठी एकेदिवशी राजा जंगलात गेला. जंगलात वनवन भटकत असताना त्याला अंगिरा ऋषींचं आश्रम दिसलं. 

राजाने ऋषीकडे राज्यातील प्रजेची व्यथा मांडली. त्यावर राजाला ऋषीने उपाय सुचवला. ते म्हणाले की, राज्यात जाऊन देवशयनी एकादशीचं व्रत खऱ्या मनाने आणि विधिपूर्वक करा. त्यामुळे राज्यात नक्की पाऊस पडेल. राजा राज्यात परतला आणि त्याने हे व्रत नियमानुसार केलं. त्यानंतर संपूर्ण राज्यात चांगला पाऊस झाला. तेव्हापासून वरुणराजाला खूष करण्यासाठी हे व्रत पाळलं जातं आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)