Astro Tips: कणिक मळताना 'या' चूक करू नका, नकारात्मक उर्जा वाढेल

चला तर मग जाणून घेऊया, पीठ मळताना कोणत्या नियमांचं पालन केलं पाहिजे. 

Updated: Nov 19, 2022, 08:59 PM IST
Astro Tips: कणिक मळताना 'या' चूक करू नका, नकारात्मक उर्जा वाढेल title=

Astro Tips: कणीक मळणं हे प्रत्येक घरात होणारं दररोजचं काम आहे. तुम्हीही सकाळी किंवा संध्याकाळी कणीक मळत असाल. मात्र तुम्ही कणीक मळताना कधी विचार केलाय का, की तुमच्याकडून एकादी चूक होतेय. तुम्ही विचार करण्यापूर्वीच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. शास्त्रानुसार, घराच्या स्वयंपाकघरासंदर्भात अनेक नियम सांगण्यात आले आहेत.

या नियमांचं पालन केल्याने शुभ मानलं जातं. इतकंच नाही तर या नियमांचं पालन न केल्यास घरात नकारात्मतका वाढू शकते. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, घर किंवा स्वयंपाकघराशी संबंधित कामांच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्या, ग्रह विघ्न आणि ग्रह दोषांना आमंत्रण मिळतं. 

चला तर मग जाणून घेऊया, पीठ मळताना कोणत्या नियमांचं पालन केलं पाहिजे. 

  • स्वयंपाकघरात तितकंच कणीक मळून ठेवा जितक्या पिठाची तुम्हाला गरज आहे. आवश्यकतेपेक्षा अधिक आणि जेवण बनवण्यापूर्वीच कणीक मळून ठेवणं निगेटीव्ह एनर्जी वाढवतं.
  • कणीक मळून फ्रीजमध्ये ठेवणं किंवा उरलेलं कणीक फ्रीजमध्ये ठेवणं अशुभ मानलं जातं. असं केल्याने घराची समृद्धी होत नाही. 
  • कणीक मळल्यानंतर कणीकला असंच सोडून देऊ नये. शास्त्रांच्या मते, कणीक मळून झाल्यानंतर त्यावर बोटांनी खुणा करू ठेवा. याचं कारण जेव्हा घरातील लक्ष्मीची म्हणजेच मुलगी किंवा सून यांच्या बोटांच्या खूणा पिठावर पडतात तेव्हा घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
  • कणीक मळून झाल्यानंतर ते कधीही उघडं ठेवू नये. याचं एक कारण आरोग्याशी संबंधित आहे. झाकलेले पीठ खराब होत नाही आणि त्यावर माशा, डास येण्याची भीती नसते.
  • पीठ मळल्यानंतर उरलेलं पाणी कधीही फेकून देऊ नये. ते पाणी झाडांना देणं शुभ मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार, ही सवय सर्वसाधारणपणे देखील लावावी कारण पिठाचं पाणी स्वच्छ असतं.