37 वर्षानंतर आलेल्या अशुभ योगातून होणार सुटका, 10 ऑगस्टला या राशींची चिंता मिटणार

मंगळ ग्रह 10 ऑगस्ट रोजी मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करेल.

Updated: Aug 9, 2022, 08:13 PM IST
37 वर्षानंतर आलेल्या अशुभ योगातून होणार सुटका, 10 ऑगस्टला या राशींची चिंता मिटणार title=

Astrology Angarak Yog 2022: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या गोचरावरून घडामोडींचा अंदाज बांधला जातो. राहु, केतु, शनि आणि मंगळ ग्रह कोणत्या ग्रहासोबत एकत्र आला यावरून शुभ-अशुभ योग ठरतात. गोचर कुंडलीनुसार 27 जुलैला मंगळ ग्रहाने मेष राशीत प्रवेश केला होता. या राशीत आधीच दीड वर्षांसाठी राहु ग्रह विराजमान आहे. ज्योतिषशास्त्रात राहु पाप ग्रह असून मंगळ ग्रहाला उग्र ग्रह म्हणून संबोधलं आहे. त्यामुळे एकाच राशीत राहु आणि मंगळ ग्रह एकत्र आल्याने अंगारक योग तयार झाला आहे. मेष राशीत 37 वर्षानंतर अंगारक योग तयार झाला आहे. ही युती 10 ऑगस्टपर्यंत असणार आहे. 10 ऑगस्टला मंगळ ग्रह मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करेल. 

ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह स्वतःच्या राशीत असतो तेव्हा तो अधिक शक्तिशाली होतो. मंगळ सध्या स्वत:च्या मेष राशीत आहे. मंगळ ग्रह मेष राशीचा स्वामी आहे आहे. त्यामुळे मंगळ या राशीत अधिक प्रभावशाली झाला आहे. मेष राशीत तयार झालेला अंगारक योग वृषभ, तूळ आणि सिंह राशीच्या लोकांसाठी अडचणी निर्माण करत आहे. पण उद्या या तीन राशींची या योगातून सुटका होईल.

मंगळ ग्रह 10 ऑगस्ट रोजी मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करेल. परंतु 30 ऑक्टोबरपर्यंत राहू मेष राशीत असणार आहे. राहू हा शुभ ग्रह मानला जात नाही. हा पाप ग्रह मानला जातो. मेष राशीत प्रवेश केल्याने माणसाच्या आयुष्यात अचानक विचित्र घटना वाढू लागतात. अशा परिस्थितीत माणसाने मन खंबीर ठेवणं गरजेचं आहे.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)