Mangalsutra and Married women connection: मंगळसूत्र हे सौभाग्याचं लेणं म्हणून ओळखलं जातं. लग्नानंतर स्त्रिया मंगळसूत्र धारण करतात. हिंदू धर्मानुसार मंगळसूत्र भगवान शिव आणि माता पार्वती यांच्याशी संबंधित आहे. मंगळसूत्रातील काळे मणी आणि सोने हे शिव-पार्वतीच्या बंधनाचे प्रतीक मानले जाते. यामध्ये काळे मणी हे शिवाचे आणि माता पार्वती सोन्याचे प्रतीक असल्याचं बोललं जातं. दुसरीकडे, ज्योतिषशास्त्रात सोन्याचा संबंध गुरू ग्रह आणि भगवान विष्णूशी आहे.
मंगळसूत्र घालण्याचे नियम
पारंपारिक मंगळसूत्रात 9 मणी असतात आणि ऊर्जेचे प्रतीक मानले जातात. देवी दुर्गेच्या 9 रूपांचे प्रतिनिधित्व करतात आणि पतीचं रक्षण करतात. तसेच वैवाहिक जीवन वाईट नजरेपासून वाचवते. त्यामुळे प्रत्येक विवाहित महिलेने मंगळसूत्र घालावे. मंगळसूत्र नेहमी शुभ मुहूर्तावर खरेदी करावे. त्याचबरोबर नवीन मंगळसूत्र चांगल्या मुहूर्तावर परिधान करावे. इतर दागिन्यांप्रमाणे ते पुन्हा पुन्हा काढू नये.
ज्योतिष शास्त्रात मंगळसूत्राबाबत एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. इतर कोणत्याही महिलेचे मंगळसूत्र कधीही घालू नये. कार इतर महिलेचं मंगळसूत्र घालणं अशुभ असते. याचा वैवाहिक जीवनावर वाईट परिणाम होतो. दुसऱ्या महिलेचे मंगळसूत्र घातल्याने पती-पत्नीमध्ये मतभेद आणि तणाव निर्माण होतो. याशिवाय मंगळसूत्रात काळे मणी पुरेशा प्रमाणात वापरावेत. तसेच क्वचितच सोने वापरा. ज्या स्त्रिया नेहमी मंगळसूत्र घालतात त्यांना गुरु ग्रहाचे शुभ परिणाम मिळतात आणि त्यांचे वैवाहिक जीवन नेहमी आनंदी राहते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)