मुंबई : शास्त्रानुसार देव-देवता आणि पूजेचं विशेष महत्त्व आहे. घरातील पूजा करताना काही नियम सांगितले आहेत. या नियमांचं पालन केल्यास घरात सुख-शांती आणि समृद्धी कायम राहाते. देव नाराज होत नाहीत असं मानलं जातं. नियमित पूजा केल्याने फायदा होतो. पूजा करताना काही गोष्टी पाळायला हव्यात त्या कोणत्या आज जाणून घेऊया.
पूजा करताना देवाला स्नान घालावं. देवाचरणी प्रसन्न आणि ताजी फूलं अर्पण करावीत. शंख हा पूजेतील महत्त्वाचा घटक आहे. त्याला पवित्र मानलं जातं. शंख हा शुभ मानला जातो. मंदिर किंवा घरात शंख ठेवल्याने लक्ष्मी प्रसन्न होते असं म्हटलं जातं. घरात सुख समृद्धी आणि शांती राहाते.
शंख चुकूनही जमिनीवर ठेवू नये. जमिनीवर ठेवल्यास तो माता लक्ष्मीचा अपमान मानला जातो. यामुळे घरात आर्थिक अडचणी येऊ शकतात. शंख चुकूनही जमिनीवर ठेवू नये. त्यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं.
पूजेमध्ये दिव्याला किंवा समईला फार महत्त्व आहे. पूजा करताना किंवा पूजेदरम्यान समई किंवा दिवा लावला जातो. दिवा किंवा समई नेहमी पूजेच्या थाळीमध्ये किंवा स्टँडवर किंवा ताम्हणात ठेवावी. चुकूनही समई किंवा दिवा, निरांजन हे जमिनीवर ठेवू नये. याशिवाय पूजेचं कोणतंही सामान हे जमिनीवर ठेवू नये. तो अपमान मानला जातो.
रत्नांचा थेट ग्रहाशी संबंध असतो. रत्नांना शुभ मानलं जातं. त्यामुळे रत्न किंवा दागिने जमिनीवर ठेवणं अशुभं मानलं जातं. नेहमी लाल कापडात दागिने गुंडाळून ठेवावेत. त्यामुळे घरात समृद्धी नांदते. संपत्तीमध्ये वृद्धी होते.
शास्त्रानुसार देवाची मूर्ती किंवा प्रतीमा किंवा फोटो जमिनीवर ठेवू नये. त्यामुळे घरात नकारात्मकता येते. मंदिराची किंवा देव ज्या ठिकाणी आहेत तिथे नेहमी स्वच्छता ठेवावी. मूर्ती नेहमी थाळी-ताटली किंवा ताम्हणात ठेवावी.
(Disclaimer: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे. अधिक बातम्यांसाठी फॉलो करा 24 Tass.com )