Basant Panchami Upay: आजच्या दिवशी सगळी कामं बाजूला ठेवून करा 'हे' उपाय; मिळवा सरस्वतीचा आशीर्वाद

Basant Panchami 2023 Upay: दर दिवसाचं काहीतरी महत्त्वं असतं. आज असाच एक दिवस. आजच्या दिवशी देवी सरस्वतीच्या पूजनानं तुम्ही शुभाशीर्वाद मिळवू शकता.   

Updated: Jan 26, 2023, 09:05 AM IST
Basant Panchami Upay: आजच्या दिवशी सगळी कामं बाजूला ठेवून करा 'हे' उपाय; मिळवा सरस्वतीचा आशीर्वाद  title=
Basant Panchami 2023 Upay to get blessings from mata saraswati

Basant Panchami 2023 Upay: आज देशाचा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2023) असण्यासोबतच एक खास दिवसही आहे. हा दिवस म्हणजे वसंत पंचमी (Basant Panchami ). आजच्या दिवशी तुम्ही घरातलं वातावरण मंगलमय राहील याकडे लक्ष द्या. हिंदू धर्मात (Hindu) देवी सरस्वतीला अनन्यसाधारण महत्त्वं आहे. वसंत पंचमीच्या दिवशी काही उपायांनी देवीचा आशीर्वाद मिळतो असं म्हणतात. असं म्हणतात की ज्यांच्यावर सरस्वतीची कृपा आहे, त्यांना कला, ज्ञान, संगीत, शिक्षण या सर्वत क्षेत्रांत उत्तम प्रगती करण्याची संधी मिळते. ज्योतिषविद्येमध्ये दिलेल्या माहितीनुसार या दिवशी केलेल्या काही कृती तुम्हाला आयुष्यभरासाठी फळतात. तुम्हाला थांबवण्याची कुणाचीही बिशाद नसते. 

तुम्हालाही देवी सरस्वतीचा उपाय हवाय का? यासाठी सर्वप्रथम मन तृप्त ठेवा आणि काही सोप्या मार्गांचा अवलंब करा. यामध्ये एका मंत्राचा जप करणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. 

वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वतीची (Maa Saraswati) पूजा करताना 'ॐ ऐं सरस्वत्यै ऐं नम:'  किंवा 'ऐं महासरस्वत्यै नमः' या मंत्राचा जप करा. या मंत्रोच्चारानं तुमच्या अंतर्मनात सकारात्मक तरंग निर्माण होऊन तुम्ही यशाच्या मार्गावर जाऊ शकाल. पूजेदरम्यान तुम्ही सरस्वतीच्या चरणी सफेद कमळपुष्प अर्पण करा. असं केल्यास देवी तुमच्यावर सहज प्रसन्न होऊन तुम्हाला कृपाशीर्वाद मिळतील. 

चंदन अर्पण करायला विसरू नका.. 

वसंत पंचमीची पूजा करतेवेळी सरस्वतीच्या चरणी पिवळ्या रंगाचं चंदन अर्पण करायला विसरु नका. पूजा संपन्न झाल्यानंतर हे चंदन तुमच्यापाशीच ठेवा. कोणत्याशी शुभकार्यासाठी घरातून बाहेर निघत असाल, तर कपाळी या चंदनाचा टिळा लावा. तुम्हाला देवीचा आशीर्वाद लाभेल. 

हेसुद्धा वाचा : Basant Panchami 2023: वसंत पंचमीला सरस्वती पूजन का करतात? जाणून घ्या तिथी, पूजा मुहूर्त आणि महत्त्व

 

इतकंच नव्हे, तर जे पालक त्यांच्या मुलांच्या शिक्षणात कोणताही व्यत्यय येऊ नये, त्यांनी उत्तमोत्तम कामगिरी करून नाव कमवावं अशी इच्छा मनी बाळगत आहेत त्यांनी घरात देवी सरस्वतीला स्थान द्या. थोडक्यात देवीचा एखादा फोटो घरात ठेवा. आजच्या दिवशी हे काम केल्यास त्याचा फायदाच आहे. आजपासून दररोज विद्यार्थीदशेतील सर्वांनीच देवीचे आशीर्वाद घ्या. 

स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवायचंय? 

हल्ली स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांच्या संख्येमध्ये तुलनेनं वाढ होत आहे. अशा सर्वांवरच देवी सरस्वतीचा आशीर्वाद कायम असेल, जेव्हा ही मंडळी त्यांच्या अभ्यास करण्याच्या ठिकाणी देवीचा एखादा फोटो ठेवतील. अभ्यासादरम्यान सर्वांनीच आपला चेहरा पूर्व किंवा उत्तरेला असावा याची काळजी घ्या. असं केल्यास नकारात्मक शक्ती तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. 

(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांवर आधारलेली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही. )