Black Thread Anklet: आतापर्यंत तुम्ही अनेक जणांच्या पायात किंवा हातात काळा धागा बांधलेला पाहिला असेल. खासकरून मुलींच्या पायात हा धागा तुम्हाला दिसेल. काही लोक याला फॅशन म्हणून परिधान करतात. तर काही लोक याकडे धार्मिक दृष्टिकोनातून पाहतात. काहींच्या मानण्यानुसार, शनिदेवाच्या प्रकोपापासून काळा धागा रक्षण करतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतो.
बहुतेक लोकांच्या पालकांनी लहानपणी मुलांच्या पायात हा धागा बांधला असतो. मात्र तुम्हाला माहितीये का पायात काळा दोरा बांधण्याचं वेगळं महत्त्व आहे. त्यांना बांधण्याची प्रथा शतकानुशतकं चालत आलीये. मात्र हा काळा धागा बांधताना त्यासंबंधी खास काळजी घेणंही गरजेचं असतं. काळा धागा बांधण्याचं महत्त्व काय आहे, ते जाणून घेऊया
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, धाग्याचा काळा रंग शनी ग्रहाशी संबंधित आहे. त्यामुळे पायावर काळा धागा बांधल्याने शनिदेव नेहमी तुमचं रक्षण करतात. यावेळी शनी देव तुमच्या जीवनात मार्गदर्शकही बनतात. असं मानलं जातं की, पायात काळा धागा बांधल्याने सुख-समृद्धी वाढते.
वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, राहू आणि केतू मायावी ग्रह मानले जातात. ग्रह राहू आणि केतू बहुतेक अशुभ प्रभाव देतात. अशा स्थितीत डाव्या पायावर काळा धागा बांधल्याने दोन्ही ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी होऊ शकतात. याच शिवाय जर कोणााला आर्थिक अडचणी असतील तर त्या देखील दूर होऊ लागतात.
ज्योतिष शास्त्रानुसार पायात काळा धागा धारण केल्याने वाईट नजर लागत नाही, असं मानलं जातं. तसंच यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर राहते. यामुळे आरोग्य आणि प्रगतीवर कोणताही वाईट परिणाम होत नाही.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )