Chaitra Purnima 2023 : हिंदू धर्मात चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. पौर्णिमा ही कोणत्याही महिन्याची शेवटच्या तारखेला येते. सध्या चैत्र महिना सुरु असून लवकरच वैशाख महिना सुरु होणार आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, ही वर्षातील पहिली पौर्णिमा आहे. खरं तर हनुमान जयंती (Hanuman Jayanti 2023) आणि पौर्णिमा एकत्र साजरी केली जाते. या दिवशी स्नान आणि दानासह भगवान सत्यनारायण सोबत हनुमानजीची पूजा केली जाते. त्यामुळे चैत्र महिन्यातील पूजेची पद्धत, शुभ मुहूर्त आणि उपाय जाणून घ्या. (chaitra purnima april 2023 confirm date 5 or 6 april pooja vidhi shubh muhurat upay Hanuman Jayanti 2023 in marathi) याशिवाय आज स्नान आणि दानाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे राशीनुसार दान करा आणि माता लक्ष्मीची कृपा मिळवा. (chaitra purnima 2023 daan these things according to your zodiac sign in marathi)
हिंदू पंचांगानुसार, चैत्र पौर्णिमा तिथी 5 एप्रिलला सकाळी 9.19 वाजता सुरू होईल आणि 6 एप्रिलला सकाळी 10.04 पर्यंत असणार आहे. खरं तर हिंदू धर्मात उदय तिथीनुसार दिवस साजरे केले जातात. त्यातच हनुमान जयंतीदेखील गुरुवारी आहे आणि उदयतिथीदेखील 6 एप्रिलला आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्र अभ्यास असं म्हणतात की, बुधवारी पौर्णिमा तिथी जास्त वेळ असली तर गुरुवारी म्हणजे आज स्नान आणि दान केलं जाणार आहे.
सूर्योदयापूर्वी सकाळी लवकर उठून आंघोळ करा.
यानंतर सूर्य मंत्रांचा उच्चार करून सूर्यदेवाची पूजा करा.
त्यानंतर भगवान सत्यनारायणाची कथा आणि पूजा करा.
चैत्र पौर्णिमेला चंद्राची पूजा केली जाते आणि चंद्राला अर्घ्य दिला जातो.
आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी सकाळी स्नान केल्यानंतर पिंपळाखाली पांढरी मिठाई आणि पाणी अर्पण करा.
घरात सुख समृद्धी राहावी म्हणून भगवान सत्यनारायणाची कथा पाठ करा.
देवी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी देवाला खीर अर्पण करा.
वैवाहिक जीवन मधुर करण्यासाठी चंद्राला अर्घ्य अर्पण करा.
मेष राशीच्या लोकांनी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी गुळाचं दान करावं.
या राशीच्या लोकांसाठी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी साखरेचं दान करावं.
मिथुन राशीच्या लोकांनी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हिरवी मूग डाळ दान करावी.
या राशीच्या लोकांसाठी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला तांदळाचं दान करावं.
या राशीच्या लोकांनी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला गहू दान करावे.
या राशीच्या लोकांना चैत्र पौर्णिमेच्या दिवशी जनावरांना हिरवा चारा खायला घालावा.
तूळ राशीच्या लोकांनी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी मुलींना खीर खाऊ घालावी आणि दानही करावं.
वृश्चिक राशीच्या लोकांनी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी गूळ आणि हरभऱ्याचं दान करावं.
जीवनात सुख-समृद्धीसाठी धनु राशीच्या लोकांनी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी मंदिरात हरभरा दान करावा.
मकर राशीच्या लोकांनी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी गरजू व्यक्तीला काळे वस्त्र दान करावे.
कुंभ राशीच्या लोकांनी चैत्र पौर्णिमेला काळ्या उडदाची डाळ दान करावी.
मीन राशीच्या लोकांनी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हळद आणि बेसनाची मिठाई दान करावी.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)