Chanakya Niti: महिलांमधील हे गुण पुरुषांना खूप भावतात, चाणक्य नीति वाचून तुम्हालाही असंच वाटेल

Chanakya Niti Quotes: आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्राची चर्चा आजही होत असते. कारण त्यांच्या नीतिशास्त्रातील धोरणं रोजच्या जीवनात तंतोतंत लागू होतात. एकंदरीत चाणक्य नीतित मानवी सभावाच्या सखोल अभ्यास केला असल्याचं दिसून येतं. नीतिशास्त्रात (Chanakya Niti) महिला आणि पुरुषांमधील अनेक बाबी अधोरेखित करण्यात आल्या आहेत.

Updated: Nov 1, 2022, 07:58 PM IST
Chanakya Niti: महिलांमधील हे गुण पुरुषांना खूप भावतात, चाणक्य नीति वाचून तुम्हालाही असंच वाटेल title=

Chanakya Niti Quotes: आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्राची चर्चा आजही होत असते. कारण त्यांच्या नीतिशास्त्रातील धोरणं रोजच्या जीवनात तंतोतंत लागू होतात. एकंदरीत चाणक्य नीतित मानवी सभावाच्या सखोल अभ्यास केला असल्याचं दिसून येतं. नीतिशास्त्रात (Chanakya Niti) महिला आणि पुरुषांमधील अनेक बाबी अधोरेखित करण्यात आल्या आहेत. तंत्रज्ञानाचं युग असलं तरी मानवी स्वभाव आजही तसाच आहे. महिला पुरुषांपेक्षा कमकुवत असल्याचं बोललं जातं. पण हिम्मत आणि धाडसाच्या बाबतीत महिला पुरुषांना मात देतात. प्रत्येक आव्हानाचं न डगमगता सामना करतात. चाणक्य नीतिनुसार, महिलांमधील गुण पुरुषांना भावतात. त्यांच्या स्वभाव गुणामुळे पुरुषांना काही केलं तरी झुकावं लागतं. 

समजूतदारपणा- आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार महिला पुरुंषापेक्षा जास्त समजूतदार असतात. प्रत्येक अडचणीत महिला विचारपूर्वक निर्णय घेतात. पण पुरुष एखादी अडचण आली तर डगमगून जातात. घाईघाईत चुकीचा निर्णय घेतात आणि नुकसान होतं. कालानुरूप महिलांमधील समजूतदारपणा अधिक दृढ होत जातो.

भावूक आणि प्रेमळ- आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार स्त्रिया खूप भावनिक आणि प्रेमळ असतात. महिलांमधील हा गुण पुरुषांना खूपच भावतो. मात्र याला महिलांची कमजोरी मानता कामा नये.

Kartik Pournima: कार्तिक पौर्णिमेला करा हे सोपे उपाय, आर्थिक अडचण होईल दूर!

भूख- चाणक्य नीतिनुसार पुरुषांच्या तुलनेत महिलांची भूख जास्त असते. महिलांची शारीरिक रचना पाहता त्यांना पौष्टीक आहाराची आवश्यकता असते. विशेष म्हणजे इतकी भूख असूनही महिला आपली भूख दीर्घकाळ रोखू शकतात.

(Disclaimer- येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)