राशीभविष्य १८ फेब्रुवारी : 'या' राशीच्या व्यक्तींच्या जीवनात होणार महत्त्वाचे बदल

जाणून घ्या कसा आहे तुमचा आजचा दिवस 

Updated: Feb 18, 2020, 09:48 AM IST
राशीभविष्य १८ फेब्रुवारी : 'या' राशीच्या व्यक्तींच्या जीवनात होणार महत्त्वाचे बदल
संग्रहित छायाचित्र

मेष- धनलाभ होण्याचा योग आहे. शत्रूवर विजय मिळवण्याची संधी तुम्हाला आहे. नोकरीच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागू शकते. विवाहप्रस्ताव येऊ शकतात. 

वृषभ- इतरांवर तुमच्या कामाचा परिणाम होणार आहे. तुमचं म्हणणं इतर लोकं ऐकतील. कुटुंबीयांचं समर्थन मिळेल. आराम करण्याची संधी मिळेल. जुन्या वादांवर तोडगा मिळेल. 

मिथुन- आर्थिक परिस्थिती बदलेले. अर्थार्जनाच्या संधी मिळतील. गांभीर्याने कोणत्याही मुद्द्याचा विचार करा. विचार करण्याचा दृष्टीकोन सकारात्मक ठेवा. सारंकाही ठीक होईल. 

कर्क- लक्षपूर्वकपणे करिअर पुढे न्या. अतिसंवेदनशील स्वभाव दूर ठेवा. ज्या गोष्टींकडे तुम्ही अडचण म्हणून पाहात आहात, त्याच गोष्टी पुढे फायद्याच्या ठरणार आहेत. 

सिंह- सामाजिक वर्तुळात तुम्ही प्रगती कराल. जास्तीत जास्त मित्रांचं तुम्हाला सहकार्य मिळेल. आर्थिक चणचण दूर होईल. एखादी नवी जबाबदारी मिळेल. तुमचं मन प्रसन्न असेल. 

कन्या- दिवस सर्वसामान्य असेल. देवाणघेवाणीचे नवे बेत आखाल. तुमच्या आजूबाजूला सुरु असणाऱ्या गोष्टींचे तुमच्यावर परिणाम होतील. काम आणि मेहनतीच्या बळावर तुम्हाला यश मिळणार आहे. 

तुळ- तुमची कामं अडकणार नाहीत. एखादं काम सुरु केलं तर त्यामध्ये संकोचलेपणा नको. इतरांच्या गरजा पूर्ण करण्यावर विश्वास ठेवा. समोर येणाऱ्या प्रत्येक संधीवर लक्ष ठेवा. 

वृश्चिक - पद, वेतन आणि अधिकारांच्या बाबतीत बढती मिळेल. कोणा एका नव्या ठिकाणी जाण्याचा योग मिळणार आहे. जितकं वास्तववादी राहणं शक्य होईल तितके वास्तववादी राहा. 

धनु- महत्त्वाच्या लोकांची साथ मिळेल. महत्त्वाची नाती आणखी चांगली होतील. काही गुंतलेले प्रश्न सुधारतील. कुटुंबात एकजुट राखण्यात यशस्वी व्हाल. 

मकर- व्यापार आणि नोकरीच्या बाबतीत काही चांगल्या संधी मिळतील. कोणा एका खास व्यक्तीशी संवाद साधाल. गुंतवणुकीच्या बाबतीत कोणाचाही सल्ला घ्या. नवं घर खरेदी करण्याची संधी मिळेल. 

कुंभ- जुन्या संबंधांना आणखी दृढ करण्याचा प्रयत्न करा. जास्तीचं काम हाती घ्या. जबाबदारी वाढेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून चांगलं सहकार्य मिळेल. 

मीन- तुमच्या जीवनात एखादा महत्त्वाचा बदल होणार आहे. अडचणी दूर होतील. तुमच्या मनात ज्या गोष्टी आहेत, त्या इतरांकडे संवाद साधतेवेळी व्यक्त करा. एखादी नवी योजना आखण्यासाठी दिवस चांगला आहे.