मेष- तुमची संवेदनशीलता परमोच्च शिखरावर असेल. नको त्या कामांपासून दूर राहा. स्वत:च्या कामांवर लक्ष ठेवा. आर्थिक अडचणी दूर होतील. व्यापारामध्ये फायदा होणार आहे. जोडीदाराची साथ मिळेल.
वृषभ- केलेल्या सर्व कामांवर लक्ष ठेवा. तुमच्यावर असणारा तणाव कमी होणार आहे. काही गोष्टींमद्ये बदल होणार आहेत. जीवनातही काही महत्त्वाचे बदल होतील. तुम्हाला इतर संबंधांतून फायदा मिळणार आहे. पती- पत्नीचं नातं आणखी दृढ होणार आहे.
मिथुन- ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणाबाहेर होत्या, त्या आता नियंत्रणात येतील. आर्थिक गोष्टींमध्ये यश मिळणार आहे. कार्यालय आणि कुटुंबात एखादी शुभवार्ता मिळेल. काही नव्या जबाबदाऱ्या मिळतील. आत्मविश्वास वाढेल.
कर्क- मित्रपरिवाराच्या इच्छा पूर्ण होतील. कोणा एका प्रसंगी चांगल्या व्यक्तींना भेटण्याची इच्छा होईल. काही महत्त्वाची कामं योग्य वेळेवर पूर्ण होतील. आज सुरु केलेल्या कामांकडे गांभीर्याने लक्ष द्या.
सिंह- कोणा एका मोठ्या गोष्टीसाठी बेत आखू शकाल. नोकरीच्या ठिकाणी एखादं महत्त्वाचं काम मिळेल. आईचं सहकार्य मिळेल. जोडीदाराकडूनही सहकार्य मिळेल.
कन्या- धनलाभ होण्याची शक्यता आहे. अर्थार्जनात वाढ होईल. प्रयत्न करा, आर्थिक परिस्थितीत बदल होणार आहेत. संतानसुख मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामाने प्रभावित असतील.
तुळ- एखादं महत्त्वाचं काम पूर्ण होणार आहे. एखादी शुभवार्ता मिळेल. समस्यांवर तोडगा निघेल. व्यापारामध्ये फायदा होणार आहे. जीवनात एक मोठा बदल होईल. ज्याच्यामुळे तुम्हाला फायदा होणार आहे.
वृश्चिक- सोबत काम करणारी लोकं मदतीची ठरणार आहेत. ज्या व्यक्तींकडून कोणतीही अपेक्षा ठेवली नसेल तीच लोकं तुमच्या मदतीची ठरणार आहेत. आर्थिक परिस्थिती बदलणार आहे.
धनु- तुमचे संबंध सुधारणार आहेत. सर्वांचाच आदर करा. व्यापार आणि नोकरीमध्ये यश मिळणार आहे. प्रेसंबंधांमध्ये सुधारणा होणार आहे. एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल.
मकर- नोकरीच्या ठिकाणी एखादा महत्त्वाचा निर्णय़ घ्यायला सोबतच्या व्यक्तींची मदत मिळणार आहे. आत्मविश्वासाने पुढे जा. एखादी शुभवार्ता तुमच्या कानांवर पडेल.
कुंभ- आज तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. कमी मेहनतीत जास्त काम करण्याची संधी मिळणार आहे. वरिष्ठ तुमच्या कामाने प्रभावित असतील. कामाच्या ठिकाणी स्वत:वर संयन ठेवा.
मीन- आज तुमची जबाबदारी वाढेल. नोकरीमध्ये जास्त तणाव असू शकतो. पण, जीवनात होणारी एखादी उलथापालथ सारं चित्र बदलून देणार आहे. दाम्पत्य जीवन सुखी असणार आहे.