close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आजचे राशीभविष्य | शुक्रवार | 24 मे २०१९

कसा असेल तुमचा आजचा दिवस

Updated: May 24, 2019, 09:14 AM IST
आजचे राशीभविष्य | शुक्रवार | 24 मे २०१९

मेष - व्यावसायिकांसाठी दिवस चांगला नाही. कोणालाही उधारीवर पैसे देऊ नका. नोकरदारवर्गाने सांभाळून राहा. ऑफिसमध्ये समस्या होऊ शकते. एखाद्या गोष्टीबाबत टेन्शन राहील. वाद होऊ शकतो. मानसिक तणाव वाढेल. जोडीदाराच्या एखाद्या गोष्टीवर मूड खराब होऊ शकतो. आजारांपासून सावध राहा. खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या.

वृषभ - विचार केलेली कामं पूर्ण होतील. अचानक धनलाभ होऊ शकतो. विचार करण्याच्या पद्धतीत सकारात्मक फरक होईल. मुलांकडून मदत मिळेल. महत्त्वाची कामं पूर्ण कराल, त्यात यश मिळेल. मित्र आणि भावंडांकडून मदत मिळेल. जोडीदाराकडून प्रेम, मदत कमी मिळेल.

मिथुन - व्यवसायात अचानक धनलाभ होऊ शकतो. जोडीदाराची मदत मिळेल. जोडीदाराचे सल्ले महत्त्वपूर्ण ठरतील. राहिलेले पैसे मिळतील. चांगल्या संधी मिळतील. चांगलं बोलून तुमचं काम पूर्ण करुन घ्याल. तब्येतीबाबत टेन्शन वाढू शकते. जेवताना सावध राहा.

कर्क - कामाच्या ठिकाणी वातावरण तुमच्या मनाप्रमाणे नसल्याने मूड खराब होऊ शकतो. प्रेमसंबंधांमध्ये असलेल्या समस्यांवर कोणताही निर्णय करता येणार नाही. ठरवलेली कामं पूर्ण होणार नाहीत. वादापासून सावध राहा. कोणावरही अवलंबून राहू नका. तब्येतीबाबत चढ-उतार राहू शकतात.

सिंह - आत्मविश्वास वाढेल. लोकांवर प्रभाव पाडू शकाल. तुमची विचार करण्याची पद्धत लोकांना आवडेल. तुम्ही दिलेल्या सल्ल्याचा लोकांना फायदा होईल. प्रेमसंबंधांसाठी दिवस सामान्य आहे. जोडीदार तुमच्या भावना समजू शकेल. सांधेदुखी त्रास देऊ शकते. 

कन्या - कुटुंबाची मदत मिळेल. मानसिक स्थिती चांगली राहील. त्यामुळे कौंटुंबिक जीवनात आनंद वाटेल. कामं पूर्ण होतील. करियर आणि गुंतवणूकीसाठी चांगल्या संधी मिळू शकतात. पैसे आणि कुटुंबाकडे पूर्ण लक्ष द्यावे लागेल. तब्येतीत सुधारणा होऊ शकते. अनेक दिवसांपासून असलेल्या तब्येतीच्या तक्रारी काहीशा कमी होतील.

तुळ - मेहनतीने यश मिळेल. तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. बढती होण्याची शक्यता आहे. कोणतीही संधी जाऊ देऊ नका. जे काम हाती घ्याल त्या कामात महत्त्वाची मदत मिळेल. लोकांकडून कामं करुन घ्याल. दिवस चांगला आहे. तब्येत सामान्य राहील.

वृश्चिक - पैशांच्या बाबतीत नुकसान होऊ शकते. कायदेशीर बाबींमध्ये अडकू शकता. वेळेकडे लक्ष द्या. काही खास कामांमध्ये अधिक मेहनत करावी लागू शकते. आज अचानक घडलेल्या कोणत्याही घटनेवर लगेच निर्णय घेऊ नका. तब्येत ठिक राहील. थकवा जाणवू शकतो. 

धनु - शेअर मार्केटमध्ये विचार करुन गुंतवणूक करा. बॉससोबत असलेल्या तुमच्या संबंधांबाबत सावध राहा. जे लोक तुमच्या करियरसाठी महत्त्वाचे आहेत ते आज त्रासदायक ठरु शकतात. एखादं काम पूर्ण झालं नाही तर ताण घेऊ नका. धैर्य ठेवा. शांततेत दिवस घालवा. तब्येत ठिक राहील.

मकर - नुकसान होऊ शकतं. दिखाव्यापासून दूर राहा. कुटुंबात आर्थिक गोष्टींवरुन वाद होऊ शकतो. अधिक जबाबदारी मिळू शकते. पैशांच्या बाबतीत सावध राहा. अन्यथा नुकसान होऊ शकते. तणावात राहाल. जोडीदाराच्या वागण्यामुळे दु:खी होऊ शकता. तब्येतीची काळजी घ्या.

कुंभ - करियरबाबत चांगली बातमी मिळू शकते. शत्रूवर भारी पडाल. जुने वाद संपवण्याचा प्रयत्न कराल. नोकरदारवर्गासाठी दिवस चांगला आहे. काही प्रश्न सुटू शकतात. नवीन लोकांशी ओळखी होऊ शकतात. व्यवसायात काही नवं केल्यास यश मिळेल. तब्येतीच्या बाबतीत सावध राहा.

मीन - करियरबाबत निर्णय सावधतेने घ्या. विचार करुन निर्णय घ्या. आज एखादं खास काम विसरु शकता. कामात चुका होऊ शकतात. दुसरे लोक त्यांची कामं तुम्हाला देऊ शकता. अधिक थकवा येऊ शकतो. प्रेमसंबंधांमध्ये चढ-उतार राहील. तब्येतीकडे लक्ष द्या. लहान-लहान समस्या वाढू शकतात.