close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आजचे राशीभविष्य | मंगळवार | २५ जून २०१९

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस 

Updated: Jun 25, 2019, 08:15 AM IST
आजचे राशीभविष्य | मंगळवार | २५ जून २०१९

मेष - अडचणींपासून उसंत मिळेल. कोणा एका गोष्टीचा अचानक फायदा होईल. कामकाजात पूर्ण लक्ष द्याल. काही करण्यारपूर्वी त्याचा सांगोपांग विचार करा. घराच्या बाबतीत आखलेल्या योजना यशस्वी ठरतील. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचा फायदा होऊ शकतो. 

वृषभ- आजच थोडे चंचल असाल. आईचं प्रेम मिळेल. वेळेसोबतच सर्वकाही ठिक होईल. मित्रांसोबत चांगला वेळ व्यतीत कराल. मनाचा आवाज ऐका, सारंकाही सुरळीत पार पडेल. 

मिथुन- मित्र आणि भावंडांची मदत मिळेल. अचानक कोणा एका खास कामाच्या दिशेने वाटचाल कराल. आज होणारे अनेक निर्णय तुमच्या पक्षात असतील. अधिकाऱ्यांच्या मर्जीत असाल. 

कर्क- आज प्रचंड उत्साही असाल. अनेक जबाबदाऱ्यांमध्ये व्यग्र असाल. व्यापार वाढवण्याचा प्रयत्न कराल. जुनी कामं मार्गी लावाल. विवाहप्रस्तावांची विचारणा होईल. अर्थार्जनाच्या नव्या संधी मिळतील. 

सिंह- कामाच्या ठिकाणी होणाऱ्या नव्या कामाचे चांगले निकाल हाती येतील. नवं प्रेमप्रकरण सुरु होऊ शकतं. प्रेमी किंवा संतानाच्या चिंतेने व्याकुळ असाल. जुन्या मित्राला भेटण्याचा योग आहे. कामाच्या निमित्ताने प्रवासयोग आहे. 

कन्या- व्यापाराच्या क्षेत्रात प्रगती कराल. महत्त्वाकांक्षी असाल. आजूबाजूच्या व्यक्तींची काही खास कामांमध्ये गरज पडू शकते. प्रवासयोग आहेत. कामाच्या ठिकाणी असणाऱ्या काही अडचणी दूर होतील. 

तुळ- आज तुमचं सर्व लक्ष कुटुंब आणि पैशांवर असेल. प्रत्येक संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करा. नोकरीच्या ठिकाणी एखादा पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. कामात व्यग्र असाल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. आई- वडिल, भाऊ- बहिणीची मदतही मिळेल. 

वृश्चिक - कामकाजावर लक्ष द्या. कामाच्या निमित्ताने प्रवासयोग आहेत. एकाग्रतेने काम करण्याच्या वृत्तीचा तुम्हाला फायदाच होईल. नवे मित्र भेटतील. मन प्रसन्न असेल. आजूबाजूच्या व्यक्तींचं सहकार्य मिळेल. 

धनु- तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. नवी जमिन खरेदी किंवा घर खरेदीचा विचार कराल. विचाराधीन कामं पूर्णत्वास न्याल. अडकलेले पैसे परत मिळतील. 

मकर- भावनात्मक समस्यांवर तोडगा निघेल. तणाव कमी होईल. अनेक नव्या जबाबदाऱ्या तुम्हाला मिळतील. अचानक कोणता महत्त्वाचा निर्णयही घेऊ शकता. 

कुंभ- आनंदवार्ता मिळेल. अपूर्ण आणि अडकलेली कामं पूर्णत्वास जातील. दैनंदिन कामांचा फायदा होईल. सामाजिकत कामांमध्ये यश मिळेल. चांगल्या व्यक्तींशी संबंध प्रस्थापित कराल. सहकाऱ्यासोबत केलेल्या कामात यश मिळेल. 

मीन- पुढे जाण्याच्या जास्तीत जास्त संधी मिळतील. आर्थिक व्यवहारांच्या बाबतील सांगोपांग विचार कराल. सकारात्मक राहा. तुमची काही खास कामं आज पूर्ण होतील. कोणा एका नव्या व्यक्तीप्रती आकर्षण वाटेल.