close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आजचे राशीभविष्य | शुक्रवार | २६ एप्रिल २०१९

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस  

Updated: Apr 26, 2019, 09:09 AM IST
आजचे राशीभविष्य | शुक्रवार | २६ एप्रिल २०१९

मेष - नोकरीबाबत काही नवीन बाबी समजतील. उत्पन्न, खर्च, कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखण्याचा प्रयत्न कराल. खुलेपणाने इतरांशी बोला. याचा फायदा होईल. तुमच्या समजूतदारपणाने नवीन संधीचा फायदा करण्याचा प्रयत्न करा. कार्यक्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल.

वृषभ - व्यावहारिक राहाल. काही खास लोकांचं तुमच्यावर तसेच तुमच्या कामावर लक्ष राहील. मोठे निर्णय घेताना विश्वासू लोकांचा सल्ला घ्या. विचार करुनच पुढील पाऊल टाका. गुंतवणूक किंवा खरेदी करताना संपूर्ण पडताळणी करुन निर्णय घ्या. आधी केलेल्या कामांचा फायदा होईल, यश मिळेल. मेहनत करावी लागेल. कौटुंबिक समस्या संपतील.

मिथुन - धनलाभाची शक्यता आहे. जास्त वेळ चालणाऱ्या कामाचा फायदा होईल. नवीन विचार, योजना आखू शकता. अविवाहितांचे विवाह जमण्याची शक्यता आहे. स्वत:च्या बुद्धीने कामं पूर्ण कराल. मित्र आणि कुटुंबाची साथ मिळेल. चांगली बातमी मिळेल. बेरोजगार लोकांसाठी दिवस चांगला आहे. 

कर्क - दिवस चांगला आहे. जुन्या समस्या सोडवल्या जातील. नवीन नोकरीसाठी आलेल्या ऑफरवर नीट विचार करा. आत्मविश्वासाने कामं करा. नातेसंबंधांमध्ये आणखी चांगल्या सुधारणा होण्याची शक्यता आहे.

सिंह - आर्थिक स्थितीत चांगले बदल होतील. कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. मोठी समस्या संपण्याची शक्यता आहे. कामं सहजतेने पूर्ण कराल. पूर्ण केलेल्या कामाकडे पुन्हा एकदा लक्ष द्या.

कन्या -  दररोजची कामं वेळेत पूर्ण करा. ऑफिसमध्ये कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. नवीन शिकण्याची संधी मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. लोकांची मदत मिळेल. गरजूंना मदत करा. पैशांसंबंधी कामं सांभाळून करा. तब्येतीची काळजी घ्या. 

तुळ - कामाकडे संपूर्ण लक्ष द्या. कामं वेळेत पूर्ण करा. व्यस्त असाल तरी मित्रांसाठी वेळ काढा. नवीन प्रेमसंबंध सुरु होण्याची शक्यता आहे. केलेल्या कामाचा फायदा होईल. धनलाभाची शक्यता आहे. 

वृश्चिक - कोणतीही गोष्ट मनात ठेवू नका. पैशांसंबंधी चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. अनुभवी लोकांच्या सल्ल्याचा फायदा होऊ शकतो. व्यवसायात जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. 

धनु - दिवस सामान्य आहे. तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल. तुमच्याकडून सहकाऱ्यांना मदत होईल. नवीन कामाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या काही योजना असल्यास त्या गुप्त ठेवा. 

मकर - दिवस चांगला आहे. काही दिवसांपासून विचार करत असलेली कामं पूर्ण होतील. धैर्य ठेवा. सर्व काही ठीक होईल. सर्वांशी आनंदाने भेटा. मित्रांसोबत दिवस चांगला जाईल. नोकरीत तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. 

कुंभ - मनात चाललेल्या बेचैनीपासून सुटका होईल. रागावर नियंत्रण ठेवा. मस्तीचा मूड राहील. कामं जबाबदारीने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. नवीन कामाची सुरुवात करण्यापेक्षा दररोजच्या कामाकडे लक्ष द्या. सामाजिकदृष्ट्या सक्रिय राहाल. मित्रांसोबत वेळ जाईल. 

मीन - मनात अनेक विचार सुरु राहतील. अनेक वेळा मूड बदलत राहील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबाकडून तसेच सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. मेहनत आणि तुमच्या ओळखीवर कामं पूर्ण कराल. दिवस चांगला आहे.