आजचे राशीभविष्य | शुक्रवार | ३ मे २०१९

कसा असेल तुमचा आजचा दिवस? 

Updated: May 3, 2019, 08:57 AM IST
आजचे राशीभविष्य | शुक्रवार | ३ मे २०१९ title=

मेष - कामासोबत तुमची जबाबदारी वाढू शकते. दिवसभर व्यस्त राहाल. व्यवसायातील काही गोष्टी समजदारीने सोडवाल. यश मिळेल. ऑफिसमध्ये शांती राहील. प्रवासाची योजना आखाल. समस्या सोडवण्याचा प्रयत्न कराल.

वृषभ - जुन्या समस्या संपतील. स्वत:वर लक्ष द्या. नवीन कपडे खरेदी करु शकता. सक्रिय राहाल. समाजिक आणि कौटुंबिक कामं पूर्ण होतील. नवीन कल्पना येतील. उत्पन्न आणि खर्चाकडे लक्ष द्यावे लागेल. यश मिळवण्यासाठी धैर्य ठेवा. मित्रांकडून मदत मिळेल. 

मिथुन - धनलाभ होण्याची शक्यता आहे. अधिक काळ चालणाऱ्या कामाचा फायदा होईल. नवीन योजना आज आखू शकाल. अविवाहित लोकांना विवाह प्रस्ताव येऊ शकतात. तुमच्या बुद्धीने कामं पूर्ण कराल. मित्र आणि कुटुंबाकडून मदत मिळेल. चांगली बातमी मिळेल. खुश व्हाल. बेरोजगार लोकांसाठी दिवस चांगला आहे.

कर्क - रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या समस्येतून मित्रांकडून मार्ग मिळेल. कामासंबंधी चांगल्या आणि व्यावहारिक कल्पना येतील. व्यवहारकुशलता आणि सहनशक्तीने काम कराल तर समस्या लवकर सुटतील. 

सिंह - आर्थिक परिस्थितीत नवे बदल होण्याची शक्यता आहे. महत्वाकांशा वाढेल. कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. अधिकारी तुमच्यावर खुश राहतील. ऑफिसमधील तणावपूर्ण स्थिती संपेल. मेहनत आणि समजदारीने जोखमीची कामं पूर्ण कराल. मोठ्या समस्या संपतील.

कन्या - कामात काही बदल केल्यास यशस्वी व्हाल. दिवस चांगला आहे. आज काही विचार कराल त्यात यश मिळेल. अधिकाऱ्यांकडून कौतुक होईल. जोडीदारासोबत वेळ घालवाल. प्रॉपर्टीची कामं पूर्ण होतील. जुनी कामं संपतील. 

तुळ - विचार करत असलेलं काम करण्यास सुरुवात करा. दिवस चांगला आहे. सामाजिक कामांसाठी दिवस चांगला आहे. कौटुंबिक कामं तुम्हालाच करावी लागू शकतात. मित्रांसोबत दिवस जाईल. गुंतवणूकीसाठी योजना आखाल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. उधार दिलेले पैसे परत मिळतील. ऑफिस आणि व्यवसायात घेतले जाणारे निर्णय फायदेशीर ठरतील.

वृश्चिक - दिवस खास राहील. अशा गोष्टी समोर येतील ज्यामुळे मोठा फायदा होईल. कठीण समस्या सोडवण्यासाठी दिवस चांगला आहे. तुमच्या समजदारीचा फायदा करा. कामाच्या ठिकाणी ओळखीच्या लोकांची मदत होईल. दिवस शुभ आहे. तब्येत चांगली राहील. रखडलेले पैसे मिळतील.

धनु - नोकरी, करियर आणि पैशांच्या बाबतीत दिवस चांगला आहे. नवीन नोकरी किंवा बढतीसाठीचे प्रयत्न पूर्ण होतील. उत्साही राहाल. नवीन लोकांशी ओळख होईल. अनेक लोकांची मदत होईल.

मकर - महत्त्वाचं काम करु शकता. त्यातून फायदा होऊ शकतो. संपूर्ण मेहनत घ्या. नवीन काम सुरु करण्याआधी रखडलेली कामं पूर्ण करा. अविवाहितांसाठी दिवस चांगला आहे. दुसऱ्यांपेक्षा पुढे जाण्याची ईच्छा राहील.

कुंभ - दिवसभर पैशांच्या बाबतीत विचार कराल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. दररोजच्या कामात वेळ जाईल. नवीन काम करण्याच्या विचारात असाल तर इतर अनेक कामं समोर येतील. काही वेळात सर्व ठीक होईल. धैर्य ठेवा. तब्येत चांगली राहील.

मीन - जे काही काम कराल त्यातून फायदा होईल. कामातून पैसे मिळतील. मनात पैशांसंबंधी काही विचार येतील. त्यावर लगेच काम करा. कागदपत्रांसंबंधी कामांकडे लक्ष द्या. काही कागद महत्त्वपूर्ण ठरु शकतात. फिरण्यासाठी दिवस चांगला आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x