Horoscope 1 August 2023 : 'या' राशीच्या लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्तीचे आगमन होईल!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

सुरभि जगदीश | Updated: Jul 31, 2023, 11:10 PM IST
Horoscope 1 August 2023 : 'या' राशीच्या लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्तीचे आगमन होईल! title=

Horoscope 1 August 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

मेष (Aries)

आजच्या दिवशी नोकरीत नवीन कामे सुरू होतील. प्लॉट खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. व्यावसायिकांनाही व्यवसायात भरपूर नफा मिळेल.

वृषभ (Taurus)

आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमच्यावर काही कठीण जबाबदाऱ्या सोपवल्या जातील.

मिथुन (Gemini)

आजच्या दिवशी बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसायात नवीन करार उपलब्ध होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. 

कर्क (Cancer)

आजच्या दिवशी आजूबाजूच्या परिसरात होणाऱ्या वादात अडकणे टाळा. एखाद्या कारणाने तुम्ही अडकण्याची शक्यता आहे. 

सिंह (Leo)

आजच्या दिवशी व्यवसायाला पुढे नेण्यासाठी खूप प्रयत्न करा. कुटुंबासोबत कुठेतरी जाण्याचा बेत होईल. आरोग्याच्या समस्या कमी होतील.

कन्या (Virgo)

आजच्या दिवशी घरबसल्या ऑनलाईन काम करणाऱ्या लोकांना विशेष लाभ मिळणार नाही. घरात नवीन पाहुण्यांचे आगमन होईल.

तूळ (Libra)

या राशीच्या व्यक्तींना वरिष्ठांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. दैनंदिन उत्पन्नात घट होईल. कुटुंबात सुरु असलेले मतभेद वाढतील. 

वृश्चिक (Scorpio)

आजच्या दिवशी पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा पूर्ण फायदा त्यांना मिळेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून भेटवस्तू मिळेल. 

धनु (Sagittarius)

आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमचे आवडते काम करून तुम्ही खूप आनंदी असाल. वरिष्ठांचेही पूर्ण सहकार्य असेल.

मकर (Capricorn)

आजच्या दिवशी व्यवसायाशी संबंधित कामासाठी बाहेर जाण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळं तुम्ही खूप आनंदी दिसाल. 

कुंभ (Aquarius)

आजच्या दिवशी मित्राच्या मदतीने तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे मिळतील. नोकरदार लोकांना दिलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. 

मीन (Pisces)

आजच्या दिवशी मित्राच्या मदतीने व्यवसायात गुंतवणूक करू शकता. नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल. एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करू शकता.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )