Horoscope 10 October 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
मेष (Aries)
आजच्या दिवशी प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या कुटुंबातील व्यक्तीचा सल्ला घेऊ शकता. संध्याकाळचा वेळ मित्रांसोबत घालवाल.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांनी काही काळ निर्णय पुढे ढकलावा. तुमच्या जोडीदारासोबत काही तणावपूर्ण गोष्टी घडू शकतात.
मिथुन (Gemini)
आजच्या दिवशी नोकरदार लोकांच्या नोकरीत बदलाच्या योजना यशस्वी होतील. देवाच्या दर्शनासाठी तुम्ही तुमच्या आई-वडिलांसोबत तीर्थयात्रेला जाऊ शकता.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी पोटाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. व्यावसायिकांना आज पैशांचा तुटवडा जाणवू शकतो.
सिंह (Leo)
आजच्या दिवशी नोकरदारांना अधिकाऱ्यांमुळे कामात अडचणी येऊ शकतात. नोकरीशी संबंधित कोणताही निर्णय तुम्ही विचारपूर्वक घ्यावा.
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी तुम्हाला कोणत्याही कामात मदत करायची असेल तर ती मनापासून करा. कोणाच्या तरी प्रभावाखाली कोणताही निर्णय घेणे टाळा
तूळ (Libra)
या राशीच्या व्यक्तींनी विचार एखाद्या मित्रासोबत शेअर करावेत. आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी समाजात तुमचा सन्मान वाढेल. कोणत्याही कौटुंबिक समस्येशी झुंजत असाल तर आज तुम्ही त्यावर उपाय शोधा.
धनु (Sagittarius)
आजच्या दिवशी नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. तुमच्या जोडीदारासोबत काही नाराजी सुरू असेल तर तीही आज दूर होईल.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी अनावश्यक वादविवादांपासून दूर राहा. कोणत्याही गुप्त गोष्टी मित्राला सांगणे टाळा. तुमची शक्ती योग्य कामात वापरा.
कुंभ (Aquarius)
आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही. नोकरीच्या निमित्ताने परदेशात जाण्याची योजना आखू शकता.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी जवळच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. तुम्हाला तुमची मिळकत आणि खर्च यात समतोल राखावा लागेल.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )