Horoscope 16 March 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
मेष (Aries)
आजच्या दिवशी दुरवरचे प्रवास नुकसानकारक ठरू शकतात. फसवणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. आरोग्याची काळजी घ्यावी.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी व्यापारात नवीन योजना आखू शकणार आहात. मनाजोग्या घटना घडून तुम्ही आनंदित होणार आहात. प्रवासातून लाभ मिळेस
मिथुन (Gemini)
आजच्या दिवशी मित्रमैत्रिणींकडून सहकार्य मिळू शकणार आहे. वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. मनातील आवडी निवडी पूर्ण करू शकणार आहात.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी बिझनेसमध्ये फसगत होण्याची शक्यता आहे. कोणाशी बोलताना गैरसमज होणार नाही याविषयी काळजी घ्यावी.
सिंह (Leo)
आजचा दिवस घरातील मोठ्या व्यक्तींची काळजी घ्यावी लागणार आहे. नोकरीत नवीन आणि मोठी जबाबदारी मिळू शकते.
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी अपेक्षित कामं रखडण्याची दाट शक्यता आहे. भांडणं वाढवणारे प्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे.
तूळ (Libra)
या राशीच्या व्यक्तींच्या कौटुंबिक स्थितीत सुधारणा होणार आहे. जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. मुलाच्या संबंधाताले प्रश्न सुटतील यासाठी प्रयत्न करा.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी चांगल्या बातम्या ऐकण्यास मिळणार आहेत. व्यापारात नवीन योजना यशस्वी होऊन तुमच्याकडे पैसा येणार आहे.
धनु (Sagittarius)
आजचा फायदेशीर दिवस राहणार आहे. काम करण्याच्या पद्धतीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. मिळालेलं काम जबाबदारीने करावं लागेल
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नये. तसंच विनाकारण वाद घालू नका. नोकरीत जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडण्याता प्रयत्न करा.
कुंभ (Aquarius)
आजच्या दिवशी महत्वाची कामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे. मोठ्या आणि महत्त्वाच्या कामकाजाचे निर्णय आज घेऊ नयेत.
मीन (Pisces)
आजच्या दिवशी इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याचे योग आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाण यश मिळू शकणार आहे.